घाटंजीत ७ ऑक्टोबरला महसूल लोकअदालत

 




३० सप्टेंबरपर्यंत दावा दाखल करण्याचे आवाहन


**घाटंजी :** जमिनीशी संबंधित प्रलंबित महसुली दावे आणि अपील परस्पर सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यासाठी घाटंजी तालुक्यात ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मंडळ अधिकारी, तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी स्तरावर विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.


**७ ऑक्टोबर रोजी** मंडळ अधिकारी स्तरावरील लोकअदालत संबंधित मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये होणार आहे. तसेच नायब तहसीलदार व तहसीलदार स्तरावरील प्रकरणे तहसील कार्यालय घाटंजी येथे घेण्यात येणार आहेत. उपविभागीय अधिकारी स्तरावरील प्रलंबित दावे व अपीलांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, घाटंजी येथे लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे.


नागरिकांनी आपली प्रलंबित प्रकरणे **३० सप्टेंबरपर्यंत** संबंधित मंडळ अधिकारी कार्यालय, नायब तहसीलदार कार्यालय, तहसीलदार कार्यालय घाटंजी किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय घाटंजी येथे दाखल करावीत, असे आवाहन तहसीलदार विजय साळवे यांनी केले आहे.


घाटंजी, शिरोली, साखरा खुर्द, शिवणी, पारवा, घोटी आदी मंडळांतील अधिकारी कार्यालयांमध्येही नागरिकांना संबंधित प्रकरणे दाखल करता येणार आहेत. (श.प्र.)

Post a Comment

Previous Post Next Post