आर्णी तालुका प्रतिनिधी/ विनोद आडे
आर्णी तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पांदन रस्त्याच्या प्रश्नावर तहसीलदार तथा दंडाधिकारी आर्णी कार्यालयात आमदार प्रा.राजुभाऊ तोडसाम यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीत तालुक्यातील विविध गावांमध्ये पांदन रस्त्याच्या विकासाबाबत सविस्तर आढावा घेऊन चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांना शेतमालाच्या वाहतूकीसाठी सुलभ मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित कामांना गती देण्याच्या सूचना आमदार प्रा.तोडसाम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच पांदन रस्त्याचे सर्वेक्षण करून निधीची उपलब्धता पाहून टप्प्याटप्प्याने कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.तसेच आमदार प्रा.तोडसाम यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने कामे करण्याचे निर्देश दिले
