सावरगाव (मंगी), पारवा येथे आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांची उपस्थिती; ग्रामस्थ व भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावरगाव (मंगी), पारवा : येथे आयोजित श्री गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास आर्णी–केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. श्री. राजूभाऊ तोडसाम यांनी उपस्थित राहून श्री गजानन महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी आमदार तोडसाम यांनी ग्रामस्थ, भाविक व आयोजकांशी संवाद साधत गावाच्या विकासासोबतच संस्कृती, परंपरा आणि श्रद्धास्थानांच्या जतनासाठी सदैव सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या उपस्थितीचे ग्रामस्थ व भाविकांनी स्वागत केले.
धार्मिक व सामाजिक उपक्रमांना पाठबळ देतानाच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
श्री गजानन महाराजांचा आशीर्वाद सर्व ग्रामस्थ व भाविकांवर सदैव राहो, अशी मनोभावे प्रार्थना उपस्थित भाविकांनी केली.
Tags
#श्रीगजाननमहाराज #प्राणप्रतिष्ठासोहळा #सावरगाव #पारवा #आमदारराजूभाऊतोडसाम #आर्णीकेळापूर #जनसेवा #जनसंपर्क #गावविकास #धार्मिकसोहळा #गणगणगणातबोते
