मूर्तीजापूर प्रतिनिधी
मूर्तिजापूर : येथील सेंट अँड हायस्कूल मध्ये पहिली परिवहन समितीची सभा दिनांक 18 .7. 2017 संपन्न झाली शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सुचिता व सिस्टर रोज मेरी यांच्या अध्यक्षतेखाली सभेची सुरुवात झाली भगवंताला वंदन करून सेबीची प्रस्तावना शाळेची क्रीडा शिक्षक ज्ञानेश ताले यांनी केली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सुचिता यांनी वाहन चालकांना मार्गदर्शन केले. गाडीमध्ये मर्यादित विद्यार्थ्यांची संख्या ठेवणे वेळेवर येणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेकडे विशेष लक्ष देणे इत्यादी आपल्या ज्या काही समस्या असतील त्या आपण सांगावे असे सूचना दिल्या.
त्याद्वारे वाहन चालकांनी आपल्या अडचणी मुख्याध्यापिकांसमोर ठेवल्या आणि त्या सूचनांचा सकारात्मक विचार आपण कराल अशी आशा ठेवली मुख्याध्यापिकांनी त्यांना आश्वासन दिले की आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही शाळा स्तरावर सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. संपूर्ण मीटिंग अत्यंत आनंदी वातावरणात संपन्न झाली शेवटी आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका पूनम बोनगिरे यांनी केले.

