विभागीय संपादक निलेश रामगावकर
अमरावती/तळेगाव दशासर : स्थानिक शशी प्रि-प्रायमरी इंग्लिश स्कूल, प्रायमरी, अपर प्रायमरी, सेकंडरी व हायर सेकंडरी स्कूलमध्ये २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या वेशभूषा साकारत त्यांच्या जीवनकार्यावर भाषणे केली. तसेच महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम, शिक्षिका बनसोड मॅडम, कसर मॅडम, अवसरे मॅडम, भुजाडे मॅडम, नेवारे मॅडम यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

