अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा युक्तिवाद... मा.अँड. संदीप ताजने

 

Washim Malegaon Maharashtra

उपसंपादक - कैलास बनसोड 

वाशिम - बहुजन चळवळीतील अभ्यासू कार्यकर्ते, संविधानिक मूल्यांचे कट्टर समर्थक आणि अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढा देणारे लढवय्ये अँड. संदीप ताजने यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातील आंबेडकरी अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते आणि कायदे क्षेत्रातील सहकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अँड. संदीप ताजने यांनी गेल्या अनेक वर्षांपासून संविधानिक मार्गाने सामाजिक न्यायासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. दलित अत्याचार प्रकरणे, जमिनीचे वाद, शिक्षण व नोकरीतील आरक्षणाचे प्रश्न यांसारख्या अनेक विषयांमध्ये त्यांनी पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. न्यायालयीन लढ्याबरोबरच सामाजिक चळवळींमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

फुले–शाहू–आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी विविध व्याख्याने, चर्चासत्रे आणि कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले आहे. "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

वाढदिवसानिमित्त वाशिम जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन अशा कार्यक्रमांद्वारे त्यांचा वाढदिवस समाजोपयोगी पद्धतीने साजरा केला जात आहे.

चळवळीतील प्रवाह परिवाराकडून अँड. संदीप ताजने यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या हातून सामाजिक न्याय, संविधान संरक्षण आणि बहुजन समाजाच्या हितासाठी असेच निरंतर कार्य घडत राहो, हीच सदिच्छा.

Post a Comment

Previous Post Next Post