चंद्रपूर प्रकरणात मोठा निकाल: विनोद खोब्रागडे निर्दोष मुक्त

 

Chandrapur Maharashtra




Gavakadachi batmi network 

चंद्रपूर (प्रतिनिधी): महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर गाजलेल्या प्रकरणात अखेर चंद्रपूर येथील माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दिनांक २ मे २०२६ रोजी विनोद खोब्रागडे यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे.

या प्रकरणात केंद्रीय व राज्यस्तरीय मंत्र्यांकडून पोलिस प्रशासनावर दबाव आणून कोणत्याही परिस्थितीत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी कोणतीही सखोल चौकशी न करता जमावाच्या दबावाखाली कथितपणे खोटा व बनावट गुन्हा दाखल केल्याचेही समोर आले आहे.

• प्रकरणाची पार्श्वभूमी •

फिर्यादी विनोद खोब्रागडे यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या नातेवाईकांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या आर्थिक हक्कावर डोळा ठेवून आरोपींनी बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करून मालमत्ता व निधी हडप करण्याचा प्रयत्न केला होता.

या संदर्भात न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर काही दिवसांतच खोब्रागडे यांच्याविरुद्धही प्रतिगुन्हा दाखल करण्यात आला, ज्याला त्यांनी “बोगस व सूडबुद्धीने केलेली कारवाई” असे म्हटले आहे.

• न्यायालयीन लढा आणि निकाल•

या संपूर्ण प्रकरणात दीर्घ न्यायालयीन लढा सुरू होता.

अखेर मुख्य न्यायदंडाधिकारी, चंद्रपूर यांनी सर्व पुरावे व युक्तिवाद लक्षात घेऊन दिनांक २/५/२०२६ रोजी विनोद खोब्रागडे यांची निर्दोष मुक्तता केली.

यापूर्वीही वरोरा येथील न्यायालयाने त्यांना अशाच एका प्रकरणात दिलासा दिला होता.

वादग्रस्त घडामोडी

जामीन प्रक्रियेदरम्यान मोठा विरोध

न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान तणावपूर्ण वातावरण

उच्च न्यायालयातही लढा सुरू

या प्रकरणातील कथित बोगस गुन्हा रद्द करण्यासाठी नागपूर खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली असून, दिनांक ५ मे २०२६ रोजी सुनावणी निश्चित आहे.

 खोब्रागडे यांचे मत

“भारतामध्ये कायद्याचे राज्य आहे, मनमानीचे नाही. खोटे गुन्हे दाखल करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकरणात नुकसानभरपाईही मिळू शकते,” असे विनोद खोब्रागडे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post