विश्वनाथ पंडित यांना निर्भीड जागल्या पुरस्काराने सन्मानित !





मुंबई: पाच दशकावून अधिक काळ सामाजिक, विधायक कार्यात अग्रेसर असणारे आणि वृत्तपत्रातून सातत्याने सामाजिक समस्या, व्यथा, वेदना आजही सातत्याने मांडत राहणारे, सामाजिक बांधिलकी एक ऋण या जाणिवेतून त्यांनी अंगीकारलेल्या सामाजिक कार्याची व त्यांच्या वृत्तपत्र लेखनाची दखल घेत मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेच्या वतीने पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते विश्वनाथ पंडित यांना निर्भीड जागल्या पुरस्काराने दादर येथील मामा काणे सभागृहात समारंभपूर्वक नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत, माजी संपादक प्रकाश कुलकर्णी, साहित्यिक बेंडखळे, मुंबईचे माजी उपमहापौर अरुण देव, विलास गुर्जर , संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभ पूर्वक सन्मानित करण्यात आले. जेष्ठ, युवा वृत्तपत्र लेखकांची उपस्थिती लक्षणीय होती. 

यावेळी मधू शिरोडकर लिखित कालप्रवाह या पुस्तकाचे पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post