जागतिक मातृदिनानिमित्त मोर्शी येथे 26 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

 





गावाकडची बातमी -जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर 

मोर्शी : जागतिक मातृदिनानिमित्त रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना अंतर्गत सामान्य शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात हर्निया,हायड्रोसिल,अंबिलिकल हर्निया,अपेंडिक्स तसेच इतर विविध आजारांवरील एकूण 26 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार,सर्जन डॉ.प्रविण बिजवे,डॉ.राहुल खन्ना तसेच भुलतज्ज्ञ डॉ.जगदीश काळभोर यांचे विशेष सहकार्य लाभले.

सदर शस्त्रक्रिया शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विनोद पवार तसेच निवासी बाह्य संपर्क अधिकारी डॉ. हेडाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.

तसेच उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील वरूड व मोर्शीचे वैद्यकीय समन्वयक डॉ.घनश्याम मानकर, रेशमा बहुरूपी,सोनाली डिकोंडवर,स्मिता पकडे,रुपाली वैरागडे,सागर झटाले,प्रवीण कापडे, नागोराव खडसे,आकाश जवंजाळ, दयानेश्वर टाकले,शोभा इंगळे तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना विभागातील वशीम शेख,सुजाता पांडे व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने रुग्णांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post