अमरावतीत मोफत रोग निदान व औषधी वाटप शिबीर उत्साहात संपन्न

 




गावाकडची बातमी & गाव सहेली नेटवर्क 

अमरावती, जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर :- क्रांतीज्योती ब्रिगेड महिला आघाडी, अमरावती आणि, Nima संघटना, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत भव्य रोग निदान शिबीर रविवार, दि. ०३ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.०० ते ९.०० या वेळेत शंकर मंदिर परिसर, वनिता समाज शाळेजवळ, आदिवासी नगर, कॅम्प, अमरावती येथे उत्साहात संपन्न झाले.

या शिबिरामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. शिबिरात रक्तदाब तपासणी, डायबेटीस तपासणी, मोफत शुगर टेस्ट तसेच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन देण्यात आले. यासोबतच गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले.

तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली. विशेषतः मधुमेह व रक्तदाब यांसारख्या आजारांविषयी योग्य माहिती देण्यात आली.

शिबिराच्या यशस्वीतेकरिता सर्व पदाधिकारी, NIMA अध्यक्ष डॉ प्रवीण औगड, डॉ राजकुमार लंगडे, डॉ विनोद मैत्रे, डॉ विजय कळंबे, डॉ राजेंद्र भामकर, एडवोकेट नंदेश अंबाडकर, स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख डॉ. राजकुमार लंगडे यांनी सर्वांचे आभार मानले.

अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात आरोग्य जागरूकता वाढीस लागून सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


Post a Comment

Previous Post Next Post