जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
अमरावती, २ मे २०२६ — गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, राधानगर (अमरावती) येथे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, बुद्ध पौर्णिमा व ग्रामजयंती निमित्त संयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश तराळ होते.
सकाळी पाच वाजता डॉ. जावरकर व प्रतिभाताई जावरकर यांच्या हस्ते तीर्थस्थापना करण्यात आली. त्यानंतर साडेपाच वाजता सामुदायिक ध्यान झाले. ध्यानानंतर बाबुरावजी धोटे यांनी मार्गदर्शन केले.
सकाळी साडेसहा वाजता गाडगे नगर परिसरातून ग्रामगीताचार्य रामदासजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रामधून काढण्यात आली. रामधूनचे महत्त्व ग्रामगीताचार्य आशाताई धारपवार यांनी विशद केले.
साडेनऊ वाजता ह.भ.प. अभियंता दिनकर चोरे यांचे काल्याचे कीर्तन झाले. साडेअकरा वाजता आयोजित मुख्य कार्यक्रमात डॉ. मोना चिमोटे (अधिष्ठाता, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ), डॉ. दिलीप काळे (अध्यासन प्रमुख), गोरखनाथ जाधव (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), अॅड. दिलीप कोहळे, सुरेखाताई लुंगारे (नगरसेवक) आदी मान्यवरांनी मार्गदर्शनपर भाषणे केली.
यावेळी पुरुषोत्तमराव गावंडे, डॉ. शोभाताई गायकवाड, राजीव बसवनाथे आणि चंदनसिंग राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त करत आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मंदा नांदुरकर यांनी केले. दुपारी दीड वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तीर्थउठाव रामदासजी सदार यांच्या हस्ते पार पडला.
संध्याकाळी सात वाजता सामुदायिक प्रार्थना झाली. प्रार्थनेनंतर प्रा. नरेंद्र राऊत यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीधर डहाके (कार्याध्यक्ष), रामदासजी सदार (कोषाध्यक्ष), प्रफुल्ल मंदा श्रीधर, बकले हरिभाऊ ठाकरे, अनंत हगवणे आदींनी परिश्रम घेतले. कडक उन्हातही गुरुदेव भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


