से.फ.ला. विद्यालयाचे उपप्राचार्य अनिल लाहोटी होत आहेत सेवानिवृत्त.....

 





जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर 

धामणगाव रेल्वे -   

 सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालयाचे जेष्ठ विज्ञान शिक्षक व सध्याचे उपप्राचार्य अनिल लाहोटी शासनाच्या नियमाप्रमाणे नियतवयोमानानुसार दि.30 एप्रिल 2026 रोजी 32 वर्षाची अखंडीत सेवा देऊन सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा हा लेख..               


सरांचे मूळ गाव भातकुली तालुक्यातले गणोरी... अतिशय सामान्य आर्थिक कुटुंबात सरांचा जन्म झाला. कुटुंबाचा पारंपारीक व्यवसाय शेती असतांना शिक्षणाला महत्त्व देणारे स्व.माणिकलाल लाहोटी यांनी आपल्या तीन्ही मूलांना उच्च शिक्षण देऊन त्यांना शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची संधी दिली. अमरावती विद्यापिठातून सरांनी एमएस्सी बॉटणी व बीएड या पदव्या प्राप्त केल्या. शिवाय फॉर्मसीचा डिप्लोमाही पूर्ण केला आहे. इ. स. 1994 मध्ये सर सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल मध्ये विज्ञान विषयाचे शिक्षक म्हणून रुजू झाले. धामणगाव रेल्वे परीसरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात विज्ञान विषयाचे उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांचा नावलौकीक आहे. सरांचे अनेक विद्यार्थी विज्ञान प्रदर्षनीत राज्यस्तरावर पोहचले आहेत. विज्ञान मंडळाचे तालुका उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.2011 मध्ये शिक्षकांसाठी शासनाने TET ही परीक्षा अत्यावश्यक पात्रता परीक्षा ग्राहय केली. सलग सहा वर्षे या परीक्षेच्या पेपर सेटिंगमध्ये सरांची महत्त्वाची भूमिका होती. धामणगाव एज्युकेशन सोसायटीने त्यांना 2025 मध्ये पर्यवेक्षक पदावरून उपप्राचार्य पदावर बढती दिली. सरांचा मुख्य विषय जीवशास्त्र असला तरी खगोलशास्त्राची सरांना आवड आहे. विद्यालयात जेव्हा भौगोलिक घटनांची माहिती देण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा सरांनी विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण माहिती देण्याचे कार्य केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये आपल्या अध्यापनाच्या माध्यमातून केवळ परीक्षेपुरते अध्यापन न करता त्यांच्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यात सरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सामाजिक क्षेत्रात सुद्धा सरांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. सरांनी माहेश्वरी हितकारक संघाचे  संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. धामणगाव शहरात समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करता यावी या करीता माहेश्वरी शिक्षण सहायता कोशची निर्मिती करण्यात आली सर त्याचे सदस्य आहे. याशिवाय धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्थेचे सर सलग दहा वर्ष सचीव म्हणून काम पाहत आहेत.             

 अनेक क्षेत्रात कार्यरत असतांना सुद्धा सरांनी कौटुंबिक बाजू उत्तम सांभाळली आहे. सरांची जेष्ठ कन्या डॉ. रश्मी MBBS MD डर्मेटॉलॉजीस्ट आहे. तर कनिष्ठ कन्या डॉ. स्नेहल MBBS पूर्ण करून MD ची तयारी करत आहे. सरांची पुतणी कु. मिनल वयाच्या 21 व्या वर्षी CA झाली. ती भारतातून चौथी होती. शिवाय पुतण्या सर्वेश 22 व्या वर्षी CA झाला. यामध्ये संपूर्ण लाहोटी कुटुंबाने आपल्या मुलांमध्ये जिद्द व आत्मविश्वास निर्माण केला शिवाय उत्तम संस्कार केले त्यामूळेच हे यश प्राप्त झाले आहे. कौटुंबिक जीवनात मिळालेल्या यशात सरांची पत्नी सौ जया यांचा मोठा वाटा असल्याचे सर प्रांजळपणे कबूल  करतात. आज सर सेवानिवृत्त होत असले तरी त्यांना अनेक क्षेत्राची आवड आहे. निवृत्ती हा शब्दच त्यांना मान्य नाही. लवकरच ते वेगळ्या क्षेत्रात कार्यरत झालेले दिसतील... यानिमित्ताने सरांना सेवानिवृत्तीच्या मनपुर्वक शुभेच्छा...  

शब्दांकन                 

प्रा. नरेश मा. कावलकर              

से.फ.ला. हायस्कूल व क.म.वि. धामणगाव रेल्वे.





Post a Comment

Previous Post Next Post