नंदिनी टारपे महिला प्रदेशाध्यक्ष, आदिवासी विकास परिषद यांची उपस्थिती...!
नांदेड,किनवट : किनवट तालुक्यातील बोधडी व चिखली येथे भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून महान मानवास अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधानातील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमास गावातील नागरिक, महिला, युवक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आदिवासी विकास परिषद महिला प्रदेशाध्यक्ष नंदिनी टारपे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांचे विचार मांडत समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
यावेळी नंदिनी टारपे म्हणाल्या की,
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी दिलेले शिक्षण, समता, बंधुता आणि न्यायाचे तत्त्व आजही समाजाला दिशा देणारे आहे. प्रत्येकाने बाबासाहेबांचे विचार आचरणात आणले तरच खऱ्या अर्थाने समाज प्रगत होईल."
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करत बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला.यावेळी माजी सभापती दिनकर दहीफळे, बोधडी गावाचे सरपंच बालाजी भिसे, उपसरपंच सुनील घुगे, अनिल भवरे सर, शेतकरी नेते रमेश कदम,मारोती शिनगारे, सुभाष बाभुळकर ,प्रा. प्रदीप एडके सुनील शिंदे,सम्राट झडते, गणपत किरवले, राजू शिंदे कॉम्रेट आडेलू बोनगीर,सुनील शिंदे, राजू कांबळे,भीमराव पाटील चिखलीकर,शेख इशरत ,बोधडी व चिखली येथील जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते व तसेच संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

