सेक्स स्कँडलच्या निषेधार्थ अचलपूर–परतवाडा शहरात कडकडीत बंद

 




संतोष भालेराव / परतवाडा

Amaravati, achalpur : परतवाडा येथे घडलेल्या कथित सेक्स स्कँडल प्रकरणामुळे संपूर्ण अचलपूर–परतवाडा जुळ्या शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर वायरल झालेल्या लैंगिक शोषणाच्या व्हिडिओमुळे नागरिक आणि व्यापारी वर्ग संतप्त झाला असून आज दोन्ही शहरांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

या प्रकरणातील मुख्य आरोपी मो. अयान मो. तन्वीर याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान अयानने या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींची नावे उघड केल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी त्या संशयितांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार, नगरपरिषद अचलपूर तर्फे आरोपी अयानच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्याबाबत हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप मिळालेली नाही.

ग्रामीण पोलीस अधीक्षक या प्रकरणावर स्वतः लक्ष ठेवून असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अजून किती लोक सहभागी आहेत, याचा तपास सुरू असून लवकरच आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आरोपींची नावे प्राथमिक माहितीप्रमाणे अयान अहमद, उजेर खान, सहाद, तबरेज  या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी प्रशासनाकडून कठोर आणि जलद कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post