जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान

 

Amaravati

Gavakadachibatmi network 

अमरावती (भीमनगर): दि.१३-०३-२०२६ रोजी. जागतिक महिला दिनानिमित्त भीमनगर परिसरात कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटनेच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविका प्रतिभा कांबळे व मदतनीस सीमा मेश्राम यांचा सन्मान करण्यात आला.



या कार्यक्रमाला भाई प्रफुल्ल मंदा श्रीधर, संदीप यादव, आशिष देशमुख, गोपाल पवार, चंदा गजभिये, अनुजा भगत, अर्पिता वाघ यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोन्ही कार्यकर्त्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या समाजोपयोगी कार्याचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे संयोजन आशिष देशमुख व अनुजा भगत (क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन) यांनी केले. यावेळी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, महिला दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम फक्त एका कार्यक्रमापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण महिनाभर परिसरातील जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना त्यांच्या कार्यस्थळी भेट देऊन भेटवस्तू देत सन्मानित करण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात येत असून समाजात त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post