उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे ‘जागतिक मौखिक आरोग्य दिन’साजरा

 


अमरावती

मोर्शी  : उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे ‘जागतिक मौखिक आरोग्य दिन’ जनजागृतीपर कार्यक्रमाद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रमोद पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी दंतचिकित्सक विभागाचे प्रमुख डॉ.पंकज मुळे व परिसेविका वर्षा दारोकर यांनी मौखिक आरोग्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.त्यांनी चुकीची जीवनशैली,अयोग्य आहाराच्या सवयी तसेच धूम्रपान हे मौखिक आजारांचे मुख्य कारण असल्याचे सांगितले.मौखिक आरोग्याचा शरीर व मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तसेच मौखिक कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून,तो प्रामुख्याने जीभ,हिरड्या,टाळू व गालाच्या आतील भागात होतो,याबाबत माहिती देण्यात आली. शरीरातील पेशींमध्ये अनियंत्रित वाढ झाल्यास कर्करोग उद्भवतो,असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन कोरडे यांनी भूषविले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक वर्षा दारोकर यांनी केले,तर संचालन श्रीकांत गोहाड यांनी केले.

यावेळी डॉ.टिंगणे,मेट्रन रूथ लोखंडे,पाटील सिस्टर,स्नेहल बेहेरे,कविता इंगोले,सुजाता पांडे,कांचन राऊत,आशिष पाटील,अमोल झाडे,विनय शेलुरे,प्रशांत बेहरे,प्रकाश मंगळे, नंदू थोरात,नागोराव खडसे,काशी बारंगे तसेच रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post