शेतकरी लाभार्थ्यांना ₹१.४२ कोटींचा थेट लाभ
तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या तत्परतेने शंभर टक्के शेतकऱ्यांना शासकीय लाभाचे वितरण
शासनाच्या जनकल्याणकारी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करत माहूर तालुक्यातील एपीएल केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यात आला आहे. तालुक्यातील एकूण ९,३२३ पात्र लाभार्थ्यांना तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या तत्परतेने १,४२,६४,१९० रुपयाची थेट रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात टाकण्यात आल्याने शेतकरी लाभार्थ्यातून शासनासह तहसीलदार अभिजीत जगताप यांचे अभिनंदन होत आहे.
ही योजना राज्यातील दुष्काळग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील ए पी एल केशरी शेतकरी कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राबविण्यात येत असून अन्नधान्याऐवजी थेट आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति महिना ₹१७० इतकी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते ही समाज उपयोगी शासकीय योजना खेड्यापाड्यातील तळागाळातील सर्व नागरिकांपर्यंत जशास तशा पोहोचून त्यांना शंभर टक्के लाभ मिळावा यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला यांच्या प्रमुख मानस उद्देश असल्याने तहसीलदार अभिजीत जगताप यांनी तालुक्यातील जवळपास सर्वच पाणंद रस्ते मोकळे केले असून सर्व प्रकारची प्रमाणपत्रे नागरिकांना घरपोच गावातच मिळावी यासाठी प्रत्येक खेडेगावात कॅम्प लावून प्रमाणपत्र वितरित करणे यासह 100% टक्के शेतकरी लाभार्थ्यांना नगदी स्वरूपाचा शासकीय लाभ देण्यासाठी दिवस रात्र शासकीय यंत्रणा राबवून शासकीय मदत त्यांच्या खात्यात वर्ग केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.
शंभर टक्के शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तहसीलदार अभिजीत जगताप यांचे सह निरीक्षण अधिकारी निलेश राऊत पुरवठा निरीक्षक गजेंद्र मिरजगावे मिलिंद वाठोरे पुरवठा लिपिक पूनम मांडवगडे संतोष पहुरकर वैभव पांढरे यांनी समन्वयाने काम करत मार्च एंड पूर्वी रक्कम खात्यात वर्ग केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.



