सार्वजनिक भीम जयंती माहूरच्या अध्यक्ष पदी मयूर पाटील यांची निवड

 


श्रीक्षेत्र माहूर पंकज जयस्वाल 

माहुर


 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जगात सर्वात मोठी जयंती म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असते...माहूर शहरात मोठी अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती आयोजित केली आहे ... या मध्ये सार्वजनिक भिम जयंती उत्सवा मध्ये दरवर्षी कार्यकारणी गठीत केली जाते विविध प्रकारचे समाजप्रबोधनाचे कार्यक्रम म्हणून महामानवाला अर्पित करून माहूर शहरात भव्य मिरवणूक काढली जाते 14 एप्रिल रोजी माहूर शहरातील -शासकीय कर्मचारी तथा सामाजिक आणि राजकीय लोकांच्या सोबत पंचरंगीं ध्वजारोहन केला जातो यात विशेष म्हणजे दरवर्षी अन्नदानाचा कार्यक्रम हा वार्ड 17 संविधान चौक शासकीय विश्राम गृह माहूर जवळ 25-30 वर्षांपासून आयोजित केला जातो- या जयंती उत्सव समिती मध्ये सर्वानुमते अध्यक्ष म्हणून -मयूर पाटील यांची निवड करण्यात आली तर -उपाध्यक्ष -तुषार चौधरी,तुषार भवरे -सचिव -मनोज तामगाडगे,रितेश धुळे - सहसचिव- चंद्रकांत पाटील,आदित्य खंदारे,- कोषध्यक्ष ,मानव शिंदे, मोहन बरडे - कार्याध्यक्ष -निहाल मोरे, विकास हाटे तर सदस्य -- माधव कांबळे, तुळशीराम चवरे, दीपक गायकवाड, दत्ता कांबळे, नैतिक कांबळे, कार्तिक कांबळे, आदेश बरडे, अभिषेक खंदारे,आकाश शिंदे, अभिषेक खानजोडे,सुशील कांबळे, क्रिश तामगाडगे,संदीप गायकवाड,दत्ता गारगोडे ,अरविंद खंदारे प्रदीप बनसोडे, गजानन जोगदंडे, धम्मा वाकोडे, 16 एप्रिल रोजी भव्य रथ,मिरवणूक संविधान चौक पासून निघणार असल्याचे -सार्वजनिक भिम जयंती उत्सव समितीचे आयोजक - सिद्धार्थ तामगाडगे, दत्ता विठ्ठल कांबळे, संयोजक -विक्रांत भगत, आदेश लांडगे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post