जय भवानी क्रिकेट क्लब तर्फे प्लास्टिक बॉलचे खुले सामने

 

Village news


 तळेगाव दशासर येथे प्रथमच नाइट सामने



निलेश रामगावकर / जिल्हा प्रतिनिधी


तळेगाव दशासर :-  स्थानिक येथील टी. सी .सी ग्राउंड येथे 22 मार्च रविवार रोजी प्लास्टिक बॉलच्या खुले सामन्याचे उद्घाटन मोठ्या थाटात तसेच अत्यंत रंगतदार आणि उत्साहपूर्ण पार पडले.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन  रावसाहेब रोठे धामणगाव  रेल्वे विधानसभा प्रमुख , यांच्या हस्ते 

पार पडले, तसेच प्रमुख अतिथी म्हणून पंकज गायकवाड, ठाणेदार किरण औटे,   नरेंद्र रामावत माजी पंचायत समिती सदस्य , बाळासाहेब शिरपूकर,  रमाकांत  इंगोले, मयबुब ठेखेदार, स्वप्नील  टारपे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

तसेच यावेळी रावसाहेब रोठे यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.





Post a Comment

Previous Post Next Post