प्रेरणादायी व्यक्तिमत्व : बबन वानखेडे

 

Baban wankhede


 जगात काही माणसे वारसाने मोठे होतात,कुणाच्या पाठिंब्याने, मदतीने यशस्वी होतात. परंतू शून्यातून स्वकर्तुत्वाने यशस्वी झालेले दुर्मिळच असतात.महाशुभ महाप्रभू दत्तात्रय स्वामी जगतजननी आई रेणूका माता श्रद्धास्थान असलेले वानखेडे परिवार. नावात काय असते असे जागतीक नाटककार विलियम शेक्सपियर म्हणतात. परंतू अडवळणीच्या सिंदगी मोहपूर सारख्या अतिदुर्गम आदिवासी गावात शेतकरी रामराव वानखेडे पिता व  लक्ष्मीबाई माता यांच्या पोटी जन्म घेऊन कठोर मेहनतीने नावाप्रमाणे यशस्वी झालेले बबन वानखेडे ५१ वर्षात पदार्पण करीत आहे वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा.

       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगी, घोटी येथे प्राथमिक शिक्षण घेऊन धावजी नाईक वस्तीगृहात राहुन सरस विद्यालय उमरी (बा ) येथे आय.टी.आय. करून फिटर च्या कामासाठी मायावी नगरी मुंबई येथील मुकूंद लिमिटेड कंपनीत खोली करून सात वर्षे काम केले .मुक्त विद्यापीठात बी ए करून गावी आले .सत्यशोधक पंढरीनाथ ठाकरे यांच्या प्रेरणादायी सल्ल्याने किनवट गाठून सेवा कम्प्युटर, सिद्धी डीटीपी व श्री विठ्ठल श्रीमनवार यांच्या समवेत जीवन के साथ भी जिंदगी के बाद भी एलआयसी चे काम केले . २००९ ला एस. बी . आय .बँकेतून असंख्य गरजूंना कर्ज काढून दिले. त्या मध्ये मी पण आहे.गोरगरिबांचा आशीर्वाद म्हणून विद्यानगर गोकुंदा येथे टोलेगंज घरात ते मातोश्री समवेत राहतात.   पाठीशी पत्नी दिपालीची  दिपज्योती समान साथ लाभली.



     सकाळी पाच वाजता उठून व्यायाम करून बॅडमिंटन खेळणे, ग्रंथ वाचणे, संगीत ऐकणे, अशी दिनचर्या सुरु होते .जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर नांदेड चौफेर,विष्णुपुरी एक्सप्रेस या वृत्तपत्रासह अग्रगण्य लोकमत चे शहर प्रतिनिधी म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ सांभाळत आहेत.प्रत्येक गाव, वाडी, पाढा, वस्ती, तांडा येथील व्यक्ती सोबत लोकसंग्रह आहे.राष्ट्रमाता जिजाऊ - सावित्री विचाराचा जागर ह्या वैचारिक कार्यक्रमाचे ते यशस्वी आयोजक आहेत.त्यांच्या लेखणीला ५१ व्या वाढदिवसानिमित्त सलाम दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना.

    प्राचार्य सुरेश पाटील

वामनदादा कर्डक संगीत अकादमी किनवट

९९२११००५८०

Post a Comment

Previous Post Next Post