विदर्भातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ ; ५ ते ३५ वयोगटातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग
मूर्तिजापूर – शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही " डान्स MZR " नृत्य महोत्सव उत्साहात पार पडला. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे तसेच निर्माता-दिग्दर्शक डॉ. प्रा. प्रशांत होर्शिळ यांच्या प्रेरणेने विदर्भातील नवोदित नृत्य व गायन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
स्थानिक राधामंगलम, तिडके नगर येथे आयोजित या महोत्सवासाठी महाराष्ट्र चित्रपट महामंडळ, विदर्भ प्रदेशाचे विलास वानखडे तसेच शहरातील दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात विदर्भातील कलाकारांनी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. प्रेक्षकांनी प्रत्येक सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद देत संपूर्ण सभागृहात जल्लोष निर्माण केला.विशेष म्हणजे, दिव्यांग कलाकारांनीही प्रभावी सादरीकरण करून “हम भी किसी से कम नहीं” हे सिद्ध केले. वर्धा येथील एका चिमुकलीने ‘महाराष्ट्र लोकनृत्य चंद्रा लावणी’ सादर करून मान्यवरांसह प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी उपनगराध्यक्ष रोहित अव्वलवार, प्रशांत हजारी, जेष्ठ पत्रकार प्रा. अविनाश बेलाडकर, आनंद उपाध्याय, कैलास महाजन, रूपाली तिडके, मिरा बोंडे, मिना मंडल, इब्राहिम घाणीवाला, अनिल बियाणी, पंकज कांबे, भारत जेठवानी, रमेश दर्यानी, अतिष महाजन, सुनील सरदार, अविनाश येवले, प्रा. श्याम कोल्हाळे, सुनील वानखडे, बाळासाहेब खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी आयोजक व स्पर्धकांचे कौतुक करत भविष्यातही असे दर्जेदार उपक्रम राबविण्याच्या शुभेच्छा दिल्या.महोत्सवाच्या माध्यमातून विदर्भातील नवोदित कलाकारांना भविष्यात चित्रपट व अल्बम क्षेत्रात संधी उपलब्ध होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बासुदेव मंडल, मंगेश तेलमोरे, वैभव वानखडे, गौरव पळसपगार, अक्षय वानखडे, गजानन चव्हाण, दिनेश श्रीवास, ऋषिकेश वाघमारे, उज्ज्वल अनभोरे, धनश्री वाशाम, श्याम काकडे, श्वेता जाधव, कोमल राशकर, विभास वानखडे, रजित शिरसाट आदींनी परिश्रम घेतले. उत्कृष्ट सूत्रसंचालन कॉमेडियन शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनीता इगळे यांनी केले.
-----------------------------------------------------------------------
स्पर्धा ५ ते १५ वर्षे (अ गट) व १६ ते ३५ वर्षे (ब गट) अशा दोन गटांत घेण्यात आली. दोन्ही गटांसाठी प्रथम क्रमांकास ३०००, द्वितीय २०००, तृतीय १००० व स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
* अ गट (५ ते १५ वर्षे)
प्रथम : प्रिशा संदीप वरके (चंद्रपूर)
द्वितीय : दिव्य आनंदी ग्रुप (अमरावती)
तृतीय : यशस्वी मदन वानखडे (किनी पवार)
उत्तेजनार्थ : स्वराज जीवन चहाकर (दिव्यांग विद्यार्थी)
* ब गट (१६ ते ३५ वर्षे)
प्रथम : सूरज धनोसकर (धामणगाव)
द्वितीय : गौरव बेडेकर (चंद्रपूर)
तृतीय : अक्षरा इंगळे ( सिरसो)
उत्तेजनार्थ : भूमेश बोरस



