दिशा फाऊंडेशन यवतमाळ तर्फे प्रा उल्हास घारड यांचा सत्कार

Gavakadachibatmi


     

 प्रतिनिधी प्रमोद घाटे                                    

दिशा फाऊंडेशन यवतमाळ यांच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक कमळूजी बापुजी डोईजड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक दिवशिय माहिती अधिकार कायदा कार्यशाळेचे आयोजन भोजने सर अकॅडमी पि.आर.पोटे कॉलेज समोर गजानन टाऊन शिप येथे दिनांक २२/२/२६ रविवार रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रा. उल्हास घारड हे आचार्य पदवीने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला दिशा फाऊंडेशन यवतमाळ तर्फे  माहिती अधिकार कायदा कार्यशाळेचे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले अँड राजेंद्जी पांडे , अंकुशजी वाशिमकर, दिशा फाऊंडेशन यवतमाळ चे अध्यक्ष गोपालजी पुरोहित कार्यक्रमाचे संयोजक दिनकरजी सुंदरकर तालुका अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, प्रमोद घाटे युवाशक्ती ग्रामविकास संगठन चे जिल्हा अध्यक्ष प्रमोद घाटे यांनी प्रा उल्हासजी घारड यांना शुभेच्छा दिल्या अमरावती येथील न्यू श्याम नगर, पोस्ट व्ही. एम. व्ही. राहणारे प्राध्यापक उल्हास मनोहर घारड यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे 'अर्थशास्त्र' या विषयात आचार्य पदवी पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. 

    प्राध्यापक उल्हास घारड यांनी डॉ. जयराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय,अमरावती येथील संशोधन केंद्र अंतर्गत "अमरावती महसूल विभागांमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाने केलेल्या गृहनिर्माण कार्याचे आर्थिक अध्ययन- कालखंड 2010- 11 ते 2020- 21" या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला.

   त्यांच्या यशाचे श्रेय त्यांनी संशोधन मार्गदर्शक डॉ. जयराम गायकवाड,डॉ. किशोर साबळे, डॉ. महेंद्र मेटे, डॉ.भारती तसेच स्वर्गीय आई-वडील मंदाबाई मनोहर घारड, पत्नी शीतल घारड, मुलं श्रीपाद व अर्णव, सासू-सासरे भीमराव खाडे,सुनंदा खाडे,अनिकेत खाडे व पद्मा खाडे यांना दिले. त्यांचे संपूर्ण परिसरात हार्दिक अभिनंदन व सत्कार मित्रमंडळी व नातेवाईकतर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post