विशेष प्रतिनिधी/ अनिल बंगाळे
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) आपली संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. माहूर-किनवट भागातील समाजकारणातील परिचित व्यक्तिमत्व रविभाऊ उत्तमराव राठोड यांनी आमदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून, त्यांची नांदेड जिल्हा सह-संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षविस्तारासाठी सुदर्शन नाईक यांचा पुढाकार
राठोड यांचा पक्षप्रवेश आणि ही महत्त्वपूर्ण नियुक्ती माहूर तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक यांच्या विश्वासामुळे आणि प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे. राठोड यांच्या येण्याने किनवट आणि माहूर तालुक्यात शिवसेनेची ताकद दुपटीने वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
आमदार व नामदार हेमंतभाऊ पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र
आमदार तथा 'बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्रा'चे अध्यक्ष हेमंतभाऊ पाटील यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राठोड यांना पुढील सूचना देण्यात आल्या आहेत:
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा प्रचार करणे.
- शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वसामान्यांना सोबत घेऊन कार्य करणे.
- दर महिन्याचा लेखी अहवाल 'बाळासाहेब भवन' कार्यालयास सादर करणे.
शिवसेना परिवारात उत्साहाचे वातावरण
या नियुक्तीचे स्वागत करताना शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माहूर तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक, किनवटचे युवा उद्योजक मनोज तिरमनवार नामदार हेमंत भाऊंचे जनसंपर्क अधिकारी सुनील गरड.वाई जिल्हा परिषद गटाचे पिंटूभैय्या पाटील वायफनीकर ज्येष्ठ शिवसैनिक विनायकराव देशमुख, विधानसभा समन्वयक हिरासिंग चव्हाण, संतोष दुबे आणि युवासेना तालुका संघटक युवा पत्रकार गोपाल नाईक यांनी रविभाऊ राठोड यांचे अभिनंदन केले आहे.
"रविभाऊ राठोड हे राजकारण आणि समाजकारणातील एक अनुभवी नाव आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक जनहिताची कामे मार्गी लागली आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे माहूर-किनवट पट्ट्यात शिवसेना अधिक आक्रमकपणे कार्य करेल," असा विश्वास तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक यांनी व्यक्त केला.
