राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन

 

Gavakadachibatmi

प्रतिनिधी /डॉ श्याम जाधव 

 नाशिक : मनु मानसी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक यांचा चौथा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या औचित्य साधून स्वराज्याचे संस्थापक आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार सोहळा २०२६ संपन्न होत आहे.

   या सोहळ्यामध्ये मानाचा फेटा, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, नाश्ता देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे अथक परिश्रम घेऊन  मेघा राजेश शिंपी संस्थापिका यांनी व कमेटी मोठे धाडस दाखवून कर्तुत्ववान विविध क्षेत्रातील आपला ठसा उमटवणारे विविध क्षेत्र माध्यमातून मानाचा सन्मान देण्याचा मानस त्यांनी मांडला विविध क्षेत्रांमध्ये काम करणारी व्यक्ती आणि संस्थेचे पदाधिकारी यांना हा पुरस्कार सोहळ्याने सन्मानित करण्यात येणार असून ७ मार्च रोजी रोटरी क्लब हॉल नाशिक गंजमाळ येथे ठीक सकाळी ११ वाजेला होणार आहे.

    राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा प्रेरणादायी व प्रेरणेने राष्ट्र मोठे होतात याची जाणवेतून राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे या पुरस्कार सोहळ्यामध्ये एकूण ५० मान्यवरांचा सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन मेघा राजेश शिंपी आणि मनु मानसी संस्थेच्या टीमने केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post