जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी

 

         

संत गाडगेबाबा जयंती

                           

छ. सं.नगर जि. प्रतिनिधी प्रतिनिधी सादिक शेख


सोयगाव: नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी यांचा सत्कार विद्यार्थ्यानी शालेय परीसर स्वच्छ करून केले अभिवादन जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती निमित्ताने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले यावेळी सोयगाव येथिल समाजसेवक तथा प्रबोधनकर यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची वेशभुषा परीधान करून विद्यार्थ्यांना संत गाडगे महाराज यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन करून स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली.यावेळी शाळे कडून सोयगाव शहर स्वच्छ ठेवण्याचे कार्यकरणार्या करणार्या नगरपंचायतीचे स्वच्छता महीला कर्मचारी याचा सत्कार करण्यात आला.यानंतर सर्व उपस्थित मान्यवर व शाळेतील विद्यार्थी यांनी शालेय परीसर झाडूने झाडून स्वच्छ करून अभिवादन केले.



 यावेळी विद्यार्थ्यानी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे आवडते भजन गोपाला गोपाल देवकीनंदन गोपाला गाऊन शालेय परीसर दनाणून सोडला यावेळी सोयगाव केंद्र प्रमुख फिरोज तडवी,समाजसेवक दत्तू रोकडे,विष्णू मापारी,दादु काळे सर्व स्वच्छता महीला कर्मचारी अगणवाडी सेविका तसेच शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील,सुरेखा चौधरी,पंकज रगडे,मंगला बोरसे,रामचंद्र महाकाळ,सविता पाटील,गणेश बाविस्कर,प्रतिभा कोळी,अकुश काळे,अनिल देसाई,विवेक महाजन,शुभम देसले,पुनम लाड उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post