छायाचित्र/ईलीयास बावानी
माहूरच्या तहसील कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन
श्रीक्षेत्र माहूर, विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे: माहूर शहरातील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबा सोनापीर दर्गाह येथे दरवर्षीप्रमाणे साजरा होणाऱ्या उर्स निमित्त माहूरच्या तहसील कार्यालयात तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत दि 26 रोजी 11.00 वाजता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सर्व अधिकारी पदाधिकारी पत्रकार बांधवांनी या बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सुफी संत बाबा सोनापीर दर्गाह येथे दरवर्षी 5 मार्च ते 10 मार्च पर्यंत ऊर्सचे आयोजन केले जाते या उर्सात सर्व धर्मीय नागरिक दर्शनासह मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा लहान मुलांना लाभ व्हावा मनसोक्त आनंद लुटता यावा यासाठी हजारोंच्या संख्येने पाचही दिवस गर्दी करत असतात त्यामुळे येथे सर्व शासकीय विभागांनी आपापल्या सुविधा द्याव्यात भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आढावा बैठकीचे आयोजन तहसील कार्यालयात करण्यात आलेले आहे.
आढावा बैठकीत सर्व विभाग प्रमुख कर्मचाऱ्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार अभिजीत जगताप. नायब तहसीलदार कैलास जेठे यांचे सह अधिकार्यांनी केले आहे..

