नाशिक प्रतिनिधी, डॉ.शाम जाधव
पुणे : दिनांक १९/२/२०२६ रोजी शिवछत्रपती महाराज जयंती दिनाचे औचित्य साधून चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा आयोजन आचार्य आत्रे रंगमंच पिंपरी चिंचवड येथे मोठ्या उत्साहात संपन्न .सुचिता रमण म्हात्रे सरस्वती शैक्षणिक संस्था पेन रायगड अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या महिला बचत गट पेण ह्या क्षेत्रामध्ये दहा दशकापासून अधिक वेगळे सामाजिक व धार्मिक माध्यमातून समाजातील जागृती करून व आपले विचार मांडून जनतेपर्यंत पोहोचणारे विविध क्षेत्रातून आपला ठसा उमटवणारे अनेक पारितोषिक राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाली. आरती झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सुनील हिरुरकर असिस्टंट टू पोलीस कमिशनर पिंपरी चिंचवड,सुरेश पोखरकर एअर फोर्स (वायुसेना) टेक्निकल ऑफिसर राहुल शिंदे,स्टार माझा डायरेक्टर सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सोबतच निर्माता आणि दिग्दर्शक बाळासाहेब बांगर हे उपस्थित होते.
त्यांच्यासोबत उमेश बांदल, भाग्यदेव घुले, अभिनेते प्रशांत तपस्वी, देव झुंबरे ,जगदीश सांधानशिव ,काजल शिंदे हे सर्व पाहुणे उपस्थित होते. जगदीश या सर्व पाहुण्यांच्या हस्ते संपूर्ण मान्यवरांचा आणि पुरस्कारार्थी यांचा सत्कार करण्यात आला व यांना पुरस्कार देण्यात आला स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते शिवजयंती निमित्त १७० पुरस्कार वाटप करण्यात आले.
स्वराज्य भीम प्रॉडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य यांचा हेतू एकच आपल्या महाराष्ट्र मध्ये जेवढे पण गोरगरीब कलाकार आहेत कवी आहेत समाजसेवक आहेत यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये समोर आणणे आणि त्यांना मानाचे स्थान मिळून देणे. या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रभर मधून कलाकार मंडळी आली होते. या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री गिरीश सुदास राजुरकर तसेच उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, सचिव मंगेश कसबे आणि खजिनदार सिद्धार्थ शिंदे हे उपस्थित होते. सोबतच स्वराज्य फिल्म ची संपूर्ण टीम या कार्यक्रमाला उपस्थित होती.
