श्रीरामानंतर महिलेचा आदर करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवराय(ॲड.माधवराव माने यांचे प्रतिपादन)

 




 श्रीकांत राऊत यवतमाळ प्रतिनिधी 


महागाव: प्रभु श्रीरामानंतर महिलेचा आदर करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवराय आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.माधवराव माने पाटील यांनी केले आहे.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त हिवरा (संगम) येथील छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व चौक सौंदर्यीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्यात उद्घाटक म्हणुन ते बोलत होते.पुढे बोलतांना ॲड.माने म्हणाले की,आज देशात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन याला आळा घालण्याकरिता छत्रपती शिवरायांनी ज्या प्रमाणे महिलेवर अत्याचार करण्याचे हातपाय तोडले व जरब बसविली, परस्त्रीस मातेचा दर्जा दिला.तीच शिकवण सताधाऱ्यांनी अंमलात आणण्याची गरज आहे. जगात प्रभु श्रीरामानंतर परस्त्रीचा आदर करणारा एकमेव राजा जर कोणी असेल ते छत्रपती शिवराय आहेत.आज देशातील तरुण पिढीला छत्रपती शिवरायांचे विचार अंगीकारण्याची गरज आहे तेव्हाच स्वराज्याचे सुराज्य निर्माण होईल असे ते म्हणाले.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.नामदेवराव ससाणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, ॲड.रमेश पाटील, ॲड.अनिल माने,माजी जि. प.सदस्य साहेबराव पाटील, माजी जि. प. सदस्या,जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.स्मिताताई साहेबराव पाटील, सरपंचा सौ.मेघाताई शिरीष बोरुळकर, उपसरपंच शरद पाटील, पोलिस पाटील प्रविण कदम ,माजी सभापती ललिताबाई वसंतराव जामकर, शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र भारती,पत्रकार गजानन वाघमारे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुकुंद पांडे,विजय बोंपिलवार,शफीसेठ सुरैय्या,अशोक जयस्वाल, ग्रा. पा. सदस्य पंजाब पाटील, राजु धोतरकर,अशोक पाटील,माजी सरपंच डॉ. धोंडेराव बोरूळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला गावकरी मंडळी,शिवभक्त ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव पाटील यांनी केले आहे संचलन राजु गिरी यांनी केले तर आभार महेश कामारकर यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी छत्रपती शिवराय चौक समितीचे अध्यक्ष देवेंद्र कदम,उपाध्यक्ष सुनिल चव्हाण,सचिव महेश कामारकर,कोषाध्यक्ष मुकुंद जामकर,सहसचिव माजी सरपंच प्रविण जामकर ,सदस्य किरण काळे,अनिल मुडेवाड, निलेश करमोडकर,शेख फिरोज,रोहित फाळके, संतोष पिंपळे,सुदर्शन कदम, प्रदीप कदम,विनोद कदम, सोनु भैसे यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post