रत्नागिरीत 'कोष्टी समाज प्रीमिअर लीग २०२६' चा थरार;

 

रत्नागिरी


   २८ फेब्रुवारीपासून सावर्डेमध्ये रंगणार क्रिकेटचा महाकुंभ


सावर्डे(प्रतिनिधी -गुरुनाथ तिरपणकर)चिपळूण :

सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डे च्या ऐतिहासिक क्रीडांगणावर.. श्री देवांग कोष्टी समाज सेवा मंडळ, रत्नागिरी या संस्थेने प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यातील कोष्टी समाजाच्या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थात " कोष्टी समाज प्रीमिअर लीग २०२६" चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दि. २८ फेब्रुवारी आणि रविवार दि. १ मार्च २०२६ या कालावधीत होणार असून स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ९:३० वाजता संपन्न होईल. या सोहळ्याचे उद्घाटन चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकम यांच्या शभहस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून

मा.चंद्रकांत धोंडू बाईत (माजी अध्यक्ष, श्री देवांग कोष्टी समाज, महाराष्ट्र) मा.सचिन सुभाष पाकळे (यशस्वी उद्योजक) मा.विजय काशिनाथ तेटांबे (यशस्वी उद्योजक) व ,समाजातील अनेक मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

     या स्पर्धेत पालगड ,दहागाव ( मंडणगड ),दापोली ,खेड , गिमव्ही, आबलोली ( गुहागर ) पेढे ,सावर्डे, दहिवली ,आगवे, मांडकी, पालवण, निवळी , (चिपळूण), आंबव, तुरळ (संगमेश्वर ) ,खरवते ,जुवाठी (राजापूर) या गावातील खेळाडूंनी स्पर्धेत उस्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला असून एकूण नामवंत १२ संघ सहभागी झाले असल्याची माहिती श्री देवांग कोष्टी समाज सेवा मंडळ ,रत्नागिरी या संस्थेचे अध्यक्ष श्री गजानन गणपत लोकरे व सेक्रेटरी श्री.अरविंद रामचंद्र भंडारी यांनी दिली आहे.

   या स्पर्धेची प्रवेश फी 3000/- रु. असून स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रुपये 33333/- आणि आकर्षक चषक, उपविजेत्या संघाला रोख रुपये 22222/- व आकर्षक चषक ,तृतीय क्रमांकाला रोख रुपये 11,111/- आणि आकर्षक चषक तर चतुर्थ क्रमांकाला रोख रुपये 7777/- आणि आकर्षक चषक त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज ,उत्कृष्ट गोलंदाज ,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सामनावीर , मालिकावीर तसेच वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सर्व खेळाडूंना टी-शर्ट,चहा - नाष्टा ,भोजन देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा ही रत्नागिरी जिल्ह्यातील कोष्टी समाजासाठी असून मर्यादित षटकांचे सामने खेळवले जाणार आहेत.

आयोजक आणि संयोजकांच्या वतीने आवाहन..

      समाजातील तरुणांना खेळाच्या माध्यमातून एकत्र आणणे आणि त्यांच्यातील क्रीडा गुणांना वाव देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेसाठी श्री देवांग कोष्टी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष गजानन गणपत लोकरे, कार्याध्यक्ष सचिन चंद्रकांत बाईत, सचिव अरविंद रामचंद्र भंडारी, खजिनदार .दिपक शाहू रेपाळ, सहसचिव दिनेश परशुराम नेटके यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्य,सल्लागार व क्रीडा समिती सदस्य परिश्रम घेत आहेत. या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आणि खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी कोष्टी समाजातील सर्व बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post