गावाकडची बातमी | उनखेडच्या जवानाची आंतरराष्ट्रीय झेप...!

 




 संतोष तायडे यांची बोस्टन मॅरेथॉन साठी दमदार पात्रता


       विदर्भ संपादक /मिलिंद जामनिक 


मूर्तिजापूर – तालुक्यातील उनखेड येथील बीएसएफ जवान संतोष तायडे (वय 48) यांनी 42 किमी मॅराथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करत अमेरिकेतील प्रतिष्ठित बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेसाठी पात्रता मिळवून जिल्ह्याचा मान उंचावला आहे.

      सध्या संतोष तायडे हे Maharashtra Ex-Servicemen Corporation Limited (मेस्को, पुणे) अंतर्गत Nagpur Municipal Corporation येथे सुरक्षा सेवेत कार्यरत आहेत. कर्तव्य बजावत असतानाही त्यांनी कठोर सराव, शिस्तबद्ध दिनचर्या आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले.

दिल्ली येथे पार पडलेल्या NDM Marathon स्पर्धेत त्यांनी बिब क्रमांक 46734 सह सहभाग घेत 42 किमी अंतर अवघ्या 03:06:52 या उल्लेखनीय वेळेत पूर्ण केले. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांनी बॉस्टन मॅराथॉनसाठी अधिकृत पात्रता निकष पूर्ण केले आहेत.

48 व्या वर्षी गाठलेले हे यश विशेष मानले जात असून संतोष तायडे यांची जिद्द, मेहनत आणि सातत्य युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, सहकारी कर्मचारी व ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आगामी Boston Marathon स्पर्धेत ते देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post