गावाकडची बातमी विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर : तालुक्यातील मुंगशी येथे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी दुकान लावलेल्या महिलेशी गैरवर्तन करत मारहाण व विनयभंग केल्याची गंभीर घटना रविवारी (दि. २२ फेब्रुवारी) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडल्याची फिर्याद 24 फेब्रुवारी रोजी दिल्यावरून ग्रामीण पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार फिर्यादी महिला या पती व मुलासह मुंगशी येथील बाजारात भाजीपाल्याचे दुकान लावून व्यवसाय करीत होत्या. दरम्यान, सकाळी सुमारे १०.३० वाजता गावातून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारचे चाक त्यांच्या दुकानावरून गेल्याचे लक्षात येताच त्यांनी चालकास 'जरा थांबा' असे सांगत जाब विचारला. यावरून आरोपी अविनाश चव्हाण याने संतापून फिर्यादीच्या मानेला हात लावत अश्लील शिवीगाळ केली. तसेच अन्य साथीदारांसह संगनमत करून महिलेला लोटलाट करत जमिनीवर पाडले. यावेळी विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्या छातीस हात लावून
गैरवर्तन केले व "तुला मारून टाकू" अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी आरोपी अविनाश चव्हाण, आकाश चव्हाण व अन्य दोन अनोळखी इसम सर्व रा. मुंगशी यांच्या विरोधात कलम 74, 296, 115 (2), 351(2), 352, 3(5) भारतीय न्याय संहिता (BNS) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर घटनेची तक्रार २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.५७ वाजता दाखल करण्यात आली असून वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Tag : #विनयभंग #धमकी #गुन्हादाखल #FIR #MaharashtraPolice #CrimeNews #SexualHarassment #Threats #JusticeServed #SafetyFirst #महिलासुरक्षा #WomenSafety #India #BreakingNews #MarathiNews
.jpeg)