शेतकरी व नागरिकांना दिलासा : महसूल शिबिरांत तात्काळ निवारण...!

 


महसूल विभाग

मुर्तिजापूर तालुक्यात महसूल विषयक अडचणींवर थेट उपाय


महसूल तक्रारींसाठी विशेष समाधान शिबिरांची मालिका : 


छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानाचा तालुक्यात शुभारंभ


Vidarbha Editor Milind Jamnik 

मुर्तिजापूर : महाराष्ट्र शासन यांच्या १८ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. १ अंतर्गत मुर्तिजापूर तालुक्यात विविध ठिकाणी महसूल विषयक तक्रारी व प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यासाठी विशेष समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

        या अभियानांतर्गत नागरिकांना महसूल सेवा सुलभ, पारदर्शक व जलद गतीने उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. शिबिरांमध्ये खालील प्रमुख विषयांवर कार्यवाही करण्यात येणार आहे :

७/१२ उतारा, फेरफार व प्रलंबित नोंदी निकाली काढणे,ई-पीक पाहणी संबंधित प्रकरणे,जमीन नोंदी दुरुस्ती, वारस नोंद व विभाजन प्रकरणे,महसूल अभिलेख तपासणी व तक्रार निवारण,शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन,नागरिकांच्या अर्जांचे तत्काळ निवारण तालुक्यात पुढीलप्रमाणे दिनांक व ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.

०७ मार्च २०२६– जिल्हा परिषद शाळा, जामठी बु.

१४ मार्च २०२६– श्री पुंडलिक महाराज संस्थान,१० एप्रिल २०२६– श्री लक्षेश्वर संस्थान, लाखपुरी,१७ एप्रिल २०२६ – श्री जागेश्वर संस्थान, कंझरा ,०८ मे २०२६ – जिल्हा परिषद हायस्कूल, नवीन गोडाऊन (लाल शाळा), हातगाव,१५ मे २०२६ – विद्याभारती हायस्कूल शेलूबाजार,२२ मे २०२६– जिल्हा परिषद हायस्कूल, माना,

२९ मे २०२६– ग्रामपंचायत कार्यालय, कुरुम

दि. १४ मार्च २०२६ रोजी श्री पुंडलिक महाराज संस्थान, पुंडलिक नगर येथे आयोजित शिबिरात आमदार हरिष पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शेतकरी व नागरिकांची महसूल विषयक प्रलंबित कामे तत्काळ निकाली काढण्यात येणार आहेत.

महसूल प्रशासनाकडून संबंधित गावांतील सर्व शेतकरी व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिरांना उपस्थित राहून आपल्या महसूल विषयक अडचणींचे निवारण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Tag : #शेतकरी #नागरिक #महसूलशिबिर #तत्काळनिवारण #शेतकरीसमस्या #नागरिकांचेअधिकार #महसूलविभाग #शिबिर #भूमीअभिलेख #जमीनसमस्या #सरकारीयोजना #महसूल #ग्रामपंचायत #Maharashtra #farmers

Post a Comment

Previous Post Next Post