प्रतिनिधी , पवन पाटणकर शिराळा
शिराळा:- जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पॅलिएटिव्ह केअर सुश्रुषा सेवा मोहिमेचा जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा अमरावती तालुक्यातील आयुष्मान आरोग्य मंदिर शिराळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना शेवटच्या क्षणापर्यंत सन्मानाने आणि वेदनामुक्त जगता यावे याकरिता आरोग्य विभागाने पुढाकार घेतलेला आहे.
यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून अकोला आरोग्य मंडळाचे उपसंचालक डॉ. सुशील वाकचोरे सर उपस्थित होते.
त्यांनी आपल्या मार्गदर्शनात पॅलिएटिव्ह केअर चे महत्व विषध करतांना प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर काम करताना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. व त्यावर उपाययोजना सुचविल्या.
अमरावतीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी पॅलिएटिव्ह केअर ची संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की मनुष्याचा मृत्यू हा अटळ असला तरी रुग्णांचे शेवटचे क्षण सुखात जावे. त्यांना आपली काळजी घेणारे कोणीतरी आहे असा मायेचा आधार वाटावा हीच या मोहिमेची मुख्य भावना आहे.
याकरिता रुग्णांच्या संवेदना समजून घेणे. त्यांना सेवा व समर्पण च्या भावनेतून आरोग्य संदर्भ सेवा देणे आवश्यक आहे.
अशा रुग्णांना फक्त सहानुभूतीची गरज नसून अनुभूतीची आवश्यकता आहे.
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आणि आशा स्वयंसेविकांनी रुग्णांना केवळ उपचार न देता मायेची फुंकर घालून त्यांचा मानसिक आधार बनावे. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला अकोला आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक मा. डॉ. सुशील पारिसे अकोला, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती श्री. प्रवीण पारिसे, जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती डॉ. विनोद पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती डॉ. संदीप हेडाऊ, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सुमित राऊत, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी अमरावती वनिता शिंदे या तज्ञ मंडळींनी या मोहिमेच्या तांत्रिक आणि सेवाभावी पैलूंवर प्रकाश टाकला व योग्य मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे मुख्य संचालन शिराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षा गोहत्रे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार आशा गटप्रवर्तक ममता धानोकार यांनी केले.
व यावेळी काम करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी बाबत आरोग्य सेविका पल्लवी इंगोले व आरोग्य सेवक, सेविका संपूर्ण टीम ने आरोग्य सेवा मंडळ अकोला चे मा. उपसंचालक डॉ. सुशील वाकचोरे यांना लेखी निवेदन सुद्धा देण्यात आले.यावेळी त्यांनी सुद्धा यावर योग्य उपाययोजना करण्याचे सुचविले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला यावेळी उपस्थितांमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षा गोहत्रे , डॉ. श्रेया तायवाडे , आरोग्य सहाय्यक रुपराव इंगळे,आरोग्य सहाय्यक देवकुमार अर्डक,आरोग्य सहाय्यिका नलिनी बोरकर, आरोग्य सेवक अतुल सोमवंशी, आरोग्य सेवक मुरलीधर भोपाळे, आरोग्य सेविका नंदा पडोळे,आरोग्य सेविका पल्लवी इंगोले,आरोग्य सेविका निकिता लोहवे,आरोग्य सेविका प्रतीक्षा भोयर, औषध निर्माण अधिकारी रेवतकर, आरोग्य सेवक ओम नन्नावरे, आरोग्य सेवक विकी गायकवाड, आरोग्य सेवक विनय उल्ले,आरोग्य सेवक आकाश धारू परिचर नारायण माहुलकर, गोमकाळे व खंडारे व इतर आरोग्य कर्मचारी आशा गटप्रवर्तक ममता धानोकार, आशा स्वयंसेवीका मंजुषा मेश्राम, ममता नागे, विठाबाई रघुते, साधना पाटणकर,नलिनी गावंडे, रेखा मोहोड,शुभांगी कडू, अर्चना घोंगडे व गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते
