एनजीओंची दशा आणि दिशा याविषयावर ऑनलाईन कार्यशाळेत मार्गदर्शन
मूर्तिजापूर - सामान्य एनजीओंचा प्रवास खूप खडतर आहे. मार्केटमध्ये त्यांची आर्थिक लूट केल्या जाते. शासनाचा निधी देण्यासाठी अनेक वेळा एनजीओंची फसवणूक करून त्यांची दिशाभूल केल्या जाते. त्यामुळे आरबी डिजीटलकडून राज्यभरातील एनजीओंचा विकास करून त्यांचा पाया मजबूत केल्या जाणार आहे. पुढील आयुष्य एनजीओंच्या विकासासाठी, असल्याचे प्रतिपादन आरबी डिजीटलचे संचालक सचिन धुमाळ यांनी केले.
एनजीओंची दशा आणि दिशा या विषयांवर राज्यभारातील एनजीओंसाठी आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यशाळेत श्री.धुमाळ बोलत होते. यावेळी राज्यभरातील अनेक संस्था संचालक, एनजीओ उपस्थित होते. पुढे बोलताना श्री. धुमाळ म्हणाले की, मोठं-मोठ्या कंपनींने त्यांचा सीएसआर फंड इतर संस्थांना न मिळावा यासाठी स्वतःच्या एनजीओ स्थापन केल्या. त्यांच्या पत्नी किंवा इतर नातेवाईकांना अध्यक्ष, सचिवपदी विराजमान केले. त्यामुळे सामान्य संस्था संचालक, एनजीओंना राज्य, केंद्र किंवा एखाद्या मोठ्या कंपनीचा सीएसआर फंड मिळत नाही. अशा वेळी एनजीओंची लाखों रुपयांची फसवणूकही केल्या जाते. साधे कागदपत्र करण्यासाठी ५० ते ६० हजार रुपये एनजीओंकडून घेतल्या जातात. त्यामुळे एनजीओंची मार्केमध्ये मोठी आर्थिक लूट होत असल्याचे अनेक प्रकरणांवरून दिसून येते. परंतु, भीतीपोटी कोणी एनजीओ समोर येत नाहीत. अशा एनजीओंची दिशाभूल झाली नाही पाहिजे, इतर संस्थांसारखाच सामान्य एनजीओंनाही केंद्र, राज्य आणि मोठ्या कंपनीचा सीएसआर फंड मिळण्यासाठी आरबी डिजीटलकडून सर्वोतपरी प्रयत्न केल्या जाणार आहेत.
केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना सामान्य एनजीओंना दिल्या जाणार आहेत. त्यामुळे सामान्य एनजीओंनी घाबरून न जाता धैर्याने रहा, माझे पुढील आयुष्य फक्त एनजीओंच्या आर्थिक विकासासाठी असणार असल्याचेही श्री.धुमाळ यांनी यावेळी सांगितले. ऑनलाईन कार्यशाळेत विदर्भ एनजीओ वेल्फेअर असोसिएशचे उषा वनारे,अमोल पोटदुखे, वैभव लखडे, विवेक नगरे, कल्याण कुसुमाडे, जया शेंडे,सिद्धार्थ समदुरे, ज्योती चिंदरकर, सोनल कोद्रे, दुषंत शेळके, सुरेश कनाके, रामचंद्र कवडे, मुकेश गुप्ता, कॅप्टन संजय कदम यांच्यासह असंख्य एनजीओ प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अनेकांच्या प्रश्नांचे निरासरनही श्री.धुमाळ यांनी केले. प्रास्ताविक विदर्भ एनजीओ वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मिलींद जामनिक यांनी केले, तर आभार सिध्दार्थ वाहुरवाघ यांनी मानले.
Tags : #Sachindhumal, #Milindjamnik, #GavakadachiBatmi #Maharashtra #India #amaravatinews #murtizapurnews, #ngo, #vidharbh, #सचिनधुमाळ, #विदर्भ, #गावाकडचीबातमी, #मिलींदजामनिक, #भारत ,#मुख्यमंत्री, #महाराष्ट्र, #नरेंद्रमोदी, #विदर्भ एनजीओ वेल्फेअर असोसिएशन, #kolkata, #ngowelfare, #मूर्तिजापूर, #Mumbai, #शाळा, #ताजीबातमी, बातमीकामाची,#विद्यार्थी, #अमोलपोटदुखे, #grampanchayat, #मदत, #सुप्रियासुळे, #देवेंद्रभोंडे, #मुंबई, #devendrafadnavis, #village #उषावनारे, #Karnataka, #AjitPawar, #उद्योगमंत्री, #पशुपालक #शेतकरी, #जिल्हाधिकारी, #जिल्हापरिषद, #विवेकनगरे, #पंचायतसमिती, #eknathsinde, #Google, #पशुसंवर्धन, #पाणीपुरवठा, #स्वच्छभारत, #fecbook, #YouTube, #instagram, #जलजीवन, #आरोग्य, #वनविभाग, #पर्यावरण, #वनस्पती, #वनीकरण, #मनरेगा, #पर्यावरणमंत्री, #गिरीशमहाजन, #ग्रामविकासमंत्री, #आरोग्यमंत्री, #सामाजिकसंस्था, #तानाजीसावंत, #बच्चूकडू, #चंद्रशेखरबावनकुळे, #राष्ट्रीय