पर्यावरण दिनानिमित्त आरोग्य उपकेंद्रात वृक्षारोपण

 

जागतिक पर्यावरण दिवस


अमरावती,मोर्शी  : कोकळगाव आयुष्यमान आरोग्य मंदीर उपकेंद्र या ठिकाणी 5 जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत व आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र कोकळगाव यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निसर्गसंपदेचे जतन आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संकल्प केला.आजचा पर्यावरण दिन साजरा करत असताना आपण सर्वांनी एका विचाराने पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी कटीबद्ध होवूया.

             पर्यावरणाच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी समाजात जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.विशेषतः येणाऱ्या पिढीवर तसे संस्कार रुजवून एक समृद्ध पिढी यातून निर्माण होईल.पर्यावरण समृद्धीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करणे ही आज काळाची गरज आहे.

      यावेळी पत्रकार द्रोणाचार्य कोळी,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत रूमणे, ग्रामपंचायत अधिकारी धनंजय धवण,आरोग्य कर्मचारी राहुल भोसले,आरोग्यसेविका श्रीमती.सी.के.जाधव,आशा स्वयंसेविका.सी.आर.सूर्यवंशी, आ सेविका कमलबाई सूर्यवंशी, ग्रामपंचायत कर्मचारी मुन्ना पठाण उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post