नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून भारतात एकाच वेळी घेतली जाते परीक्षा
राज्यात दुसरा क्रमांक पटकाविल्याने निशांत वर होते अभिनंदनचा वर्षाव
श्रीक्षेत्र माहूर - श्रीक्षेत्र माहूर शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील तालुका लेखापाल नितीन वट्टमवार यांचा मुलगा निशांत वट्टमवार याने सन 2025 मध्ये सैनिक स्कूल पात्रता परीक्षा दिली होती याचा नुकताच निकाल लागून निशांत वट्टमवार याचा राज्यात दुसरा क्रमांक आल्याने निशांत वट्टमवार यांनी माहूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे याच पात्रता परीक्षेत निशांत याचा मोठा भाऊ वेदांत वट्टमवार याने गतवर्षी ही परीक्षा उत्तीर्ण करून सध्या तो चंद्रपूर येथील सैनिक स्कूलमध्ये शिकत आहे.
माहूरच्या भाग्यवान भवरे संचलित राजर्षी राजश्री शाहू फाउंडेशन अंतर्गत जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल येथे इयत्ता पाचव्या वर्गात शिक्षण घेत वडील नितीन वटमवार आई डॉ श्रीदेवी वट्टमवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंढरपूर येथीलआय कॅन इन्स्टिट्यूट चे संचालक विवेक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली क्लासेस मध्ये अभ्यास करून भारतात नावाजलेल्या सैनिक स्कूल पात्रता परीक्षेत त्याने सोलापूर येथे जाऊन परीक्षा दिली परीक्षेत निकाल लागल्यानंतर निशांत याचा राज्यात दुसरा क्रमांक आला चार विषयांमधून इंग्रजी आणि आय टी या विषयांमध्ये पैकीच्या पैकीतर दोन विषयात 300 पैकी 293 गुण घेतले सदरील परीक्षा ही सहावा वर्ग आणि नववा वर्गासाठी घेतली जाते.
अत्यंत शिस्तीत आणि तणावाच्या वातावरणात होत असलेल्या सैनिक स्कूल पात्रता परीक्षेत निशांत नितीन वट्टमवार याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावल्याने त्याच्या आई-वडिलांसह आजोबा ओमप्रकाश मुनगिलवार आजी नागमणी मुनगिलवार आजोबा गोविंद वट्टमवार आत्या मेघा कोल्हे पंढरपूर नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश माचेवार वैद्यकीय अधीक्षक डॉ.किरण वाघमारे ,भाग्यवान भवरे, डॉ पद्माकर जगताप, डॉ.निरंजन केशवे, डॉ.राजेश सामशेट्टिवार, डॉ.प्रसन्न पांडे डॉक्टर राम कदम यांचे सह मान्यवरांनी निशांत वट्टमवार आणि वट्टमवार परिवाराचे अभिनंदन केले आहे.