गावाकडची बातमी| किनवट येथील शिवरायांच्या पुतळ्याच्या स्थळाला मुहर्त मिळेना

 

Kinvat




Kinvat



किनवट- छत्रपतीं शिवरायांच्या नविन आश्वारुढ पुतळ्याच्या जागेचा तिढा तेवत राहिल्याने ६ जून २०२५ रोजी किनवट शहरात शिवराज्याभिषेकाच्या ३५२ व्या दिनापर्यंतही पुतळा स्थानापन्न होऊ शकला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार भीमराव केरामांच्या निधी प्रस्तावाला सढळ मदत दिल्यानंतरही पुतळास्थळ विकासाला मुहूर्त सापडले नाही. किनवट नगर परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी तथा तहसिलदार डाॅ.मृणाल जाधवांच्या काळात पारीत केलेल्या ठरावाच्याच जागी भविष्यात पुतळा स्थानबद्ध होणार कि, जुन्या पुतळ्याच्या ठिकाणी ? यावर मात्र तुर्तासतरी तोडगा निघालेला नाही. परंतू त्यांच्या उपस्थितीत आमदार केरामांच्या हस्ते भूमीपुजन झाल्यानंतर भाजपातीलच एका विघ्नसंतोषाने आ.केरामांच्या बगलेत बसूनच रान पेटवल्याने दोन वर्षापासून पुतळा उभारलेला नसल्याची लोकांच्या मनातली खदखद कालच्या सोहळ्याप्रसंगी ऐकायला मिळाली. सहायक जिल्हाधिकारी जेनिथ चन्द्रा दोन्थुला यांनी परवा बोलावलेल्या सर्वसमावेशक बैठकीनंतर मात्र पुर्वीच्याच जागेविषयीच्या आशा पल्लवीत होत असल्याचे शिवप्रेमी सूत्रांकडून समजते. 

    दरम्यान प्रशासन, छत्रपती शिवराय पुतळा कृती समिती विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जनसंघर्ष समितीद्वारा उभारलेल्या संघर्षामुळे कदाचित भूमीपुजन केलेल्या जागेला खो बसून पुर्वीच्याच जागेवर शिक्कामोर्तब होण्याच्या शक्यतेचे चित्र पहायला मिळाले. "जुनी जागा आणि नवी जागा", यावर मतमतांतरांचा प्रवाह समोर आला. प्राथर्नास्थळाच्या मुद्यावरुनही वैचारीक मंथन झाले. दोन वर्षाच्या काळात खूपकांही उलथापालथी झाल्याचे पहायला मिळाले. ६ जून २०२३ मधला ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा असेल अथवा छत्रपतींचा पुर्णाकृती आश्वारुढ पुतळा आगमन सोहळा असेल यात माहूर नगरीपासून किनवटपर्यंतच्या मिरवणूक सोहळ्यात सर्वधर्मीयांनी स्वयंस्फूर्त सहभाग दर्शवला तो क्षण म्हणजे किनवटच्या बंधूभाव, एकात्मतेची साक्ष देणारा ऐतीहासिक होता. भाजपातीलच बहूचर्चीत आ.केरामांच्या निकटवर्तीय बापबेट्यांनी कपटनितीचा वापर करुन द्विधा भूमीका बजावल्याने पुतळा उभारणी परिसराच्या विकासाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. अशी कुनकून भाजपातील सूत्रांकडून ऐकायला मिळते. आ.केरामांच्या हस्ते भूमीपुजन करण्याची घाई करुन त्यांना बदनाम करण्यासाठी पुतळा जागा विकासाला रेंगाळत ठेवण्याचे कारस्थान त्याच विकृतीने केल्याचा ठपका ठेवल्याची चर्चा सूत्रांकडून ऐकायला मिळते.

     नगर परिषद प्रशासन, पुतळा कृती समिती आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जनसंघर्ष समिती यांची एक बैठक घेऊन सहायक जिल्हाधिकार्‍यांनी पुतळा उभारणीची जागा निश्चीत करण्यासाठीच्या प्रतिक्रीया जाणून घेऊन वरिष्ठांकडे अहवाल पाठवल्याचे समजते. सामोपचारातून छत्रपतींचा पुतळा उभा करण्यासाठीचा प्रशासनाचा शुद्ध प्रयत्न दिसतो. किनवटच्या आस्मितेत आणि वैभवातील भर तसेच सर्वांचा श्वास म्हणजे छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे. लवकर तोडगा आणि लवकर पुतळा परिसर विकास व्हावा ही किनवटकरांची प्रलंबीत अपेक्षा आहे. २०२३ च्या भूमीपुजनानंतर आणखी आमदार केरामांच्या हस्ते पुन्हा एकदा भूमीपुजन होणार कि काय ?, ३५३ व्या शिवराज्याभिषेका पुर्वी छत्रपती विराजमान व्हावेत ही शिवप्रेमींची इच्छा दिसते.

Post a Comment

Previous Post Next Post