मूर्तिजापूरात आपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई
विदर्भ संपादक मिलींद जामनिक
मुर्तिजापूर : शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी आणि निर्णायक कारवाई बुधवारी पार पडली. या कारवाईत गोवंश जातीच्या तब्बल १४९ कातड्यांसह २७ पिंप जनावरांची चरबी जप्त करण्यात आली असून, २ आरोपींना अटक करण्यात आले आहे. एकूण जप्त मालमत्ता ₹५,४०,६०० इतकी असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार १८ जून २०२५ रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास, पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरून बोलेरो पिकअप (MH 40 N 5804) वाहनातून गोवंश कातडी व जनावरांची चरबी अवैधरित्या वाहून नेली जात आहे.त्यावरून पोलीसांनी कांरजा टी-पॉईंट येथील उड्डाणपुलावर सापळा रचून वाहनाला अडवले आणि तपासणी दरम्यान
गोवंश जातीची १४९ कातडी (प्रत्येकी वजन २१ किलो, दर ₹२०० प्रमाणे – एकूण किंमत ₹२९,८००)२७ पिंप जनावरांची चरबी (प्रत्येकी वजन ३० किलो, दर ₹४०० प्रमाणे – एकूण किंमत ₹१०,८००) बोलेरो पिकअप वाहन (MH 40 N 5804 – अंदाजे किंमत ₹५,००,०००)असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी ,मोहम्मद शेख आरिफ (वय २० वर्षे), रा. गणेश नगर पांढरी, ग्रामपंचायत अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती,मोहम्मद हाशम शेख कासम (वय ३८ वर्षे), रा. इंदिरा नगर कुरेशीपुरा, बडनेरा, जि. अमरावती असून या प्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन ला भारतीय दंड विधान – कलम ३२५, ३(५) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम – कलम ५(१)(क), ९(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, व सहायक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कार्यवाहीत ठाणेदार अजीत जाधव, पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, पोहेका रवी जाधव, पोहेका सचिन दांदळे, पोकों गजानन खेडकर आणि पो कों लक्ष्मण लोखंडे यांचा मोलाचा सहभाग होता.