गावाकडची बातमी | हातभट्टीची दारू पकडली.. नवीन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची धाडसी कारवाई

 

Police

 छायाचित्र ईलीयास बावानी माहूर 


नवीन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची धाडसी कारवाई 


हातभट्टी दारू काढून विक्री करण्यात महिलांचा सहभाग वाढला जनजागरणाची आवश्यकता


वेगवेगळ्या गावात चार गुन्हे दाखल तब्बल सत्ता वीस हजाराचा दारू साठा पकडला 


     विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 

श्रीक्षेत्र माहूर  : माहूर पोलीस ठाण्याचे सपोनी शिवप्रकाश मुळे यांची बदली झाल्याची वार्ता कानी पडताच अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्याचे मनोबल वाढल्याने त्यांनी विविध गावात धुमधडाक्यात दारू विक्री सुरू केल्याची माहिती मिळाल्याने नव्याने रुजू झालेले दबंग पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतःसहकार्या समवेत अनेक गावात धाडी टाकून चार दारू विक्रेत्यावर एकाच दिवसात तब्बल चार गुन्हे दाखल केले असून 27 हजार रुपयांचा हातभट्टी दारूचां साठा जप्त करण्यात आल्याने पोनी गणेश कराड यांनी आल्या आल्यात हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांना दणका दिल्याने अवैधरित्या देशी-विदेशी हातभट्टीची दारू विकणाऱ्यात घबराट पसरली आहे


माहूर तालुक्यातील अनेक गावात दारू विक्री सुरू झाल्याच्या तक्रारी आल्याने पोनि गणेश कराड यांनी पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्येबोईनवाड यांचे वेगवेगळे पथक तयार करून कूपटी रामपूर तांडा पापलवाडी तांदळा या गावात अचानकपणे धाडी टाकून चार गुन्हे दाखल केले यामध्ये एकूण 27 हजार रुपयाचा हातभट्टी दारूचा साठा नष्ट करणे कामी जप्त करण्यात आला आणि चार दारू विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले अनेक ठिकाणी दारूसाठी जप्त करण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांना महिलांच्या असभ्य वर्तणुकीचा सामना करावा लागला


माहूर तालुक्यातील अनेक गावात महिलांना समोर करून अवैध दारू विक्रेत्यांनी दारू विक्री सुरू केल्याने पोलिसांना अनेक ठिकाणी अडचण निर्माण होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दारू विक्री करणाऱ्या महिलाविरुद्ध कारवाया करण्यासाठी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांना विशेष अधिकार द्यावे किंवा जनजागरण करण्यासाठी पथकाची निर्मिती करावी अन्यथा पावसाळ्यात पावसाचा महापूर तर खेड्यापाड्यात गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करण्यासाठी दारूचा महापूर सुरू होईल या शंका नाही या कारवाईत ए एस आय बाबू जाधव पोलीस नाईक प्रकाश गेडाम पोहेका गजानन चौधरी शारदासूत खामनकर पो का सागर दरंगे नवनाथ कोरडे ज्ञानेश्वर वेलदोडे प्रशांत भोपळे संदीप गोपानवाड दत्ता सोनटक्के ज्ञानेश्वर खंदाडे पवन राऊत महीला पो हे का पुष्पा पुसणाके महिला पोलीस सारिका राठोड सोनू ताई भुरके शिल्पा राठोड शिवनंदा जाधव यांचे सह महिला पुरुष होमगार्ड सह पोलीस पाटलांनी भाग घेऊन चार गुन्हे दाखल केल्याने अवैध दारू विक्रेत्यात खळबळ उडाली असून दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आल्याने अवैध रित्या हात भट्टी देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्यांना महाप्रसादांसह जेलची हवा खावी लागेल असा कडक ईशारा नव्याने रुजू झाले पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post