अपहार केलेल्या रकमेचा वसुलीचा आदेश
विशेष प्रतिनिधी संतोष भालेराव
Amaravatinews :- अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कांडली ग्रामपंचायत येथील सरपंच सविता आहाके व माजी उपसरपंच व सदस्य दिलीप उर्फ गंगा थंडारे यांनी पदाचा दुरुपयोग करत कर्तव्यात कसुर केल्याने व अनियमितता तथा अपहारीत प्रकरणी अपात्र घोषित करत रक्कम वसुलीचा आदेश अप्पर आयुक्त अमरावती सुरज वाघमारे यांनी २३ मे रोजी निर्गमीत केला आहे. काही दिवसापूर्वी गंगा धंडारे यांच्या तक्रारीवरुन ग्रामपंचायतीचे दोन सदस्य अपात्र करण्यात आल्यानंतर पती-पत्नी यांना अपात्र करण्याचे आदेश कांडली गावात विशेष चर्चीला जात आहे.
कांडली येथील माजी सरपंच सुषमा भारत थोरात यांनी सरपंच सविता दशरथ आहाके तत्कालीन उपसरपंच गंगा थंडारे, ग्रापं सदस्य अफसर बानो शे. खुद्दस, अक्षया आकाश काकड व सचिव यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ ची कलम ३९ (१) अन्वये प्रकरण दाखल करत तक्रार केली होती कि ग्राम हिताच्या दृष्टीकोनातून काम न करता पदाचा दुरुपयोग करून दलित वस्ती अंतर्गत मंजुर निधी दलित वस्तीत न वापरता इतरत्र वापरला तर १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून साहित्य खरिदतही घोळ करून ते साहित्य उपलब्ध नसुन सामान्य फंडाच्या निधीचा गैरवापर करून निविदा प्रक्रिया ही न राबविता विद्युत्त साहित्य खरिदी केले. अंगणवाडी साफसफाई मंडप डेकोरेशन भाडे, ची रक्कम अदा करतांना प्रशासकिय मान्यता न घेता मोठ्या प्रमाणात आर्थीक घोळ केला. त्याचप्रमाणे १५ व्या वित्त आयोगातून फर्निचर खर्चावर लाखो रूपये नियमाचे पालन न करता अदा करण्यात आले. असे तक्रारीत नमुद केले होते. यावर अप्पर आयुक्त यांनी दलित वस्ती योजनेचा निधी व कामे योग्य प्रकारे झाल्याचे म्हटले आहे.
(Grampanchayat, Achalpurnews, panchayat samiti Achalpur, amaravati , newsmarathi, Maharashtra , India, Devendrafadnavis, kandaligrampanchayat )
१५ व्या वित्त आयोगातून खरिदी करण्यात आलेले साहित्य ग्रामपंचायतीत आढळुन आले नाही. २०२२-२३ या आर्थीक वर्षात अपना इलेक्ट्रीकल्स कांडली यांच्या कडून खरिदी करण्यात आलेल्या साहित्यात आर्थीक घोळ, त्याचप्रमाणे सरंपच मेळाव्याकरीता करण्यात आलेला बिछायत खर्च नियमबाहय आहे. तसेच अभिन्यास मंजूरी बाबत व १५ वित्त आयोगाच्या कामाच्या निविदा प्रक्रियेत दोषी असल्याचे दिसुन येते. तसेच इतर साहित्य खरिदीतही अनियमिता असल्याचे म्हटले आहे. या सर्व आरोपांची चौकशी करत अप्पर आयुक्त यांनी तक्रारदारांचा अर्ज मान्य करत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ ची कलम ३९ (१) अन्वये सरपंच सविता आहाके व दिलीप धंडारे यांना अपात्र ठरवित रक्कम वसुली बाबत आदेश निर्गमीत केला आहे.
"वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार"
सदर प्रकरणी अप्पर आयुक्त यांच्या न्यायालयात लेखी जवाबासह दस्तावेज सादर करून सुध्दा त्यांनी कसलाही विचार न करता आमच्या विरोधात आदेश दिला असुन हा आदेश अन्यायकारक असल्याने वरिष्ठ न्यायालयात दाद मागु...
गंगा धंडारे, सदस्य
Tags : Grampanchayat, Achalpurnews, panchayatsamiti Achalpur, कांडली ग्रामपंचायत, kandaligrampanchayat, #गावाकडचीबातमी #जिथेगाव #तिथेआम्ही #गावसहेली #gavsheli, #Latestnews, #village news, #Vidarbha #Marathwada #Khandesh, #शिक्षण, #क्रीडा, #सांस्कृतिक, #ग्रामपंचायत, #मनोरंजन, #Konkan, #Bharat, #Maharashtra, #India, #YouTube, #Google, #fecbook, #instagram, #socialmedia, #digitalmedia, #newsportal, #ija, #Telangana, #up, #जिल्हापरिषद,#जिल्हाधिकारी,#madyapradesh, #UttarPradesh, #DistrictCouncil, #HealthDepartment, #DistrictCollector #Entertainment,#Movies,#GramPanchayat, #PanchayatSamiti, #newstoday, #Jharkhand,#Assam, #Punjab, #police , #Indianarmy, #cm, #MP, #MLA, #ChiefMinister, #PrimeMinister,#President, #Agriculture, #Farmers, #Corruption, #Injustice, #Atrocities, #खासदार, #आमदार, #मुख्यमंत्री, #पंतप्रधान, #राष्ट्रपती, #किसान, #शेतकरी, #मित्र,#शिवसेना, #मनसे, #बसपा, #वंचित,#भाजपा, #कांग्रेस, #bjp, #congress, #shivsena, #mns, #bsp, #RPI, #rti, #RighttoInformation, #humanrights, #ncp, #commission for women, #crime,#सीबीआय, #cid, #ed, #RTO, #राष्ट्रवादी, GavakadachiBatmi.com. पंचायत समिती अचलपूर, तहसील कार्यालय अचलपूर, ग्रामविकासमंत्री , जिल्हाधिकारीअमरावती, अप्पर आयुक्त अमरावती,
(पंचायत विभाग अमरावती, गावाकडची बातमी, जिल्हा परिषद अमरावती, पंचायत समिती अचलपूर, तहसील कार्यालय अचलपूर, मुख्यमंत्री, मुख्यकार्यकारी, ग्रामविकासमंत्री)
गावाकडची बातमी साठी आजचं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा..👇