चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे बोगस डॉक्टर रूद्र रॉबीन मंडल हे कोणत्याही शैक्षणिक पदवी किंवा डिप्लोमाशिवाय महाकाली क्लिनिक चालवत आहे. डॉक्टरच्या निष्काळजीपणा आणि बेजबाबदार कार्यामुळे 11 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
या संदर्भात मुलीच्या पालकांनी पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाला तक्रार करूनही डाक्टर व धनंजय मेडीकल चे संचालक वर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने मृत मुलीची आई शिला नाईक आणि वडील मोरेश्वर नाईक यांनी पत्रकार परिषदेद्वारे डॉक्टर आणि मेडकील संचालका वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास जिलाधिकारी कार्यालय समोर आरोग्य विभागाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे. (bogus doctor negligence case India) , (Medical Council Maharashtra), (Indian Medical Council)
मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांनी सांगितले की, त्यांच्या 11 वर्षांच्या समता नावाच्या मुलीची प्रकृती 30 जुलै 2024 रोजी अचानक बिघडली. तिला उपचारासाठी वरोरा तहसीलमधील खांबाडा येथील डॉ. रूद्र रॉबीन मंडल, महाकाली क्लिनिक येथे नेण्यात आले. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली. आणि तिला रक्त तपासणीसाठी खांबाडा येथील प्रयोगशाळेत पाठवले.
जेव्हा चाचणीचा अहवाल डॉक्टरांना दाखवण्यात आला तेव्हा त्याला काही गोळ्या देऊन घरी पाठवण्यात आले. दुसयां दिवशी डॉक्टरांनी मोरेश्वर नाईक ला फोन करून पुन्हा रुग्णालयात बोलावले. डॉक्टरांनी मुलीला 100 मिली सलाईनमध्ये तीन इंजेक्शन देऊन चढविण्यात आले. काही वेळानंतर तीला डिस्चार्ज देण्यात आला.घरी पोहोचल्यानंतर अर्ध्या तासाने, मुलीचे शरीर थंडीमुळे थरथर कापू लागले. मुलीची तब्येत आणखी बिघडली. सलाईनमुळे मुलगी अशक्त होऊ लागली. मुलीची अवस्था पाहून पालक काळजीत पडले. त्यांनी डाक्टर मंडल कडे नेल्यावर घरगुती उपाय करून पाहिले आणि मुलीच्या शरीरावर थंड पाणी शिंपडले आणि को-या कागदावर तिला काही औषधे लिहुन दिली.
पण मुलगी औषधे घेण्याच्या स्थितीत नव्हती. त्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. मुलीची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी तिला दुस_यां रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. (Bogus Doctor Negligence Death) मुलीच्या वडिलांनी तिला ताबडतोब हिंगणाघाट येथील एका चांगल्या डॉक्टरकडे नेले.
संबंधित डॉक्टरांनी मुलीची प्रकृती अधिक गंभीर असल्याने तिला सरकारी रुग्णालयात रेफर करण्यास सांगितले. सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अल्पवयीन मुलगी समता हिला मृत घोषित केले.
वडील मोरेश्वर नाईक आणि शिला नाईक यांनी खांबाडा चे डाक्टर मंडल यांच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कामामुळे आणि धनंजय मेडिकल स्टोअरचे संचालक यांनी बोगस डाक्टर च्या प्रिस्क्पीप्शन वरून औषधी दिल्यामुळे मुलीचा मृत्यु झाला. या संदर्भात डॉक्टर आणि मेडीकल संचालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रशासनास केली आहे. कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य विभागाविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा मोरेश्वर नाईक आणि शिला नाईक यांनी दिला आहे.
ज्या गावात हे बोगस डॉक्टर आढळून येत आहे. सर्वात आधी सचिव ,आरोग्य अधिकारी यांच्या वर सुद्धा कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून मागणी होत आहे.
असे आहेत शासनाचे आदेश 👇
संबंधित ग्रामपंचायत सचिव यांचे कर्तव्य आहे.बोगस डॉक्टर आढळून आल्यास तत्काळ तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. पण अशे कुठल्याही प्रकारची कार्यवाही ग्रामपंचायत कार्यालय सचिव करत नाही. उलट बोगस डॉक्टरांना पाठराखण करतात हे स्पष्ट आहे..
Tags :- मेडिकल कौन्सिल महाराष्ट्र, जिल्हा पोलीस अधीक्षक, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, मुंबई, महाराष्ट्र, गावाकडची बातमी, चंद्रपूर, वरोरा, बोगस बंगाली डॉक्टर, फर्जी डॉक्टर, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, DIRECTOR OF HEALTH SERVICES MS MUMBAI-MUMBAI, FAILURE IN TAKING LAWFUL ACTION, SHRC, Maharashtra, India, chandrapur, Maharashtra,Zilla Parishad Chandrapur, Warora, Taluka Health Officer, Zilla Parishad Health Department, Zilla Parishad Health Officer, District Collector Chandrapur, Maharashtra police, अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय, जबाबदार आरोग्य यंत्रणा आणि पोलीस विभाग, ग्रामपंचायत, आरोग्य समिती, ग्रामपंचायत कार्यालय सचिव,