आवास प्लस ॲप तांत्रिक अडचणीत.! घरकुल आवास प्लस योजनेत नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी- रवि राठोड

 

Gharkul Awas Plus- Ravi Rathod


मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांची मागणी


Gavsheli, Maharashtra, India


 शासन अधिकृत आवास प्लस या ॲपच्या माध्यमातून नोंदणी करत असताना घरकुल लाभासाठी पात्र असताना देखील ॲपच्या तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी न झाल्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना नोंदणी करिता मुदतवाढ अशी विनंती मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

माहूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दुर्बल घटकांना शासनाकडून देण्यात येणारे घरकुल लाभार्थ्यांना पात्र असताना देखील आज पर्यंत शासनाकडून अधिकृत आवाज प्लस या ॲपद्वारे नोंदणी करण्या साठी म्हणून दिनांक. 31/05/2025. ही शेवटची तारीख देण्यात आली होती.


परंतु आवाज प्लस ॲपच्या तांत्रिक अडचणी मुळे अनेक पात्र लाभार्थीची नोंदणी होऊ शकली नसल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील सर्व लाभार्थ्यांच्या वर होत असलेल्या अन्याय होऊ नाही. यासाठी आवास प्लस आप द्वारे करण्यात येणाऱ्या नोंदणी करता याव्यात म्हणून मुदतवाढ देऊन सर्व पात्र लाभार्थ्यांना नोंदणी करण्या साठी मुदतवाड देण्यात यावी. अशी विनंती मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड. शक्ती परमार अमर कोण राज यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post