मोक्ष भावेश भंडारीचे दहावी मध्ये घवघवीत यश..!

 

Moksha Bhavesh


गामदेवी,मुंबई (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

यंदा महाराष्ट्र राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्यी मुलींची टक्केवारी 96.14 अशी आहे, तर मुलांची टक्केवारी 92.21 अशी आहे. यात शारदा मंदिर हायस्कुल, गामदेवी, मुंबई च्या मोक्ष भावेश भंडारी या विद्यार्थ्याने दहावी मध्ये दैदिप्यमान यश संपादन केले आहे. 93 टक्के मार्क्स मिळविणाऱ्या मोक्ष भंडारी याने आपल्या आई वडिलां सोबत आपल्या समाजाचे तसेच आपल्या कुटुंबियांचे देखील नाव रोशन केले आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले मोक्षचे वडील भावेश सुकनराज भंडारी आणि आई मिता भावेश भंडारी, दादाजी - सुकनराज भंडारी आणि दादीजी - शांता सुकनराज भंडारी कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून मोक्षच्या कलागुणांचे आणि त्याला मिळालेल्या यशाचे मुंबईत सर्वत्र कौतुक केलं जात आहे..

Post a Comment

Previous Post Next Post