![]() |
अमरावती चांदूरबाजार: चांदूरबाजार तालुक्यातील नानोरी गावात जन सुविधा योजनेअंतर्गत दत्त मंदिर परिसरात नवीन ग्रामपंचायत इमारत आणि भक्त निवास बांधण्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक गौतम खंदारे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी २२ जानेवारी २०२५ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, चांदूरबाजार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीत ग्रामसेवक आणि सरपंचांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
२५ मार्च २०२५ रोजी विस्तार अधिकाऱ्यांनी नानोरी ग्रामपंचायतीच्या फायलींची प्रत्यक्ष तपासणी केली. या तपासणीदरम्यान, जन सुविधा योजना आणि तीर्थ विकास निधी अंतर्गत दत्त मंदिर परिसरातील भक्त निवास बांधण्यात गंभीर अनियमितता आढळून आली. प्राप्त साहित्याची स्टॉक रजिस्टरमध्ये नोंदणी न करणे, निविदा प्रक्रियेत अनियमितता, प्राप्त कागदपत्रे न तपासता निधी वाटप करणे यासारख्या प्रशासकीय अनियमितता उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणात तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी प्रदीप भाकरे, मदन अकोलकर, सुरेश रेखाते आणि शिवप्रसाद सोनू हे प्रथमदर्शनी जबाबदार असल्याचे आढळून आले आहे.
तथापि, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, चांदुरबाजार यांनी अद्याप कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केलेली नाही. यामुळे वारंवार पाठपुरावा करूनही कारवाईला विलंब होत असल्याचा आरोप तक्रारदार गौतम खंदारे यांनी केला आहे. त्यांनी आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे आणि दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. नानोरी येथील या भ्रष्टाचार प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.आणि प्रशासनाने केलेल्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Tags : #गावाकडचीबातमी #जिथेगाव #तिथेआम्ही #गावसहेली #gavsheli, #Latestnews, #village news, #Vidarbha #Marathwada #Khandesh, #शिक्षण, #क्रीडा, #सांस्कृतिक, #ग्रामपंचायत, #मनोरंजन, #पर्यावरण #Konkan, #प्रदुषण, #स्वच्छभारत, #सुंदरभारत, #Bharat, #Maharashtra, #India, #YouTube, #Google, #fecbook, #instagram, #socialmedia, #digitalmedia, #newsportal, #ija, #Telangana, #up, #जिल्हापरिषद,#जिल्हाधिकारी,#madyapradesh, #UttarPradesh, #DistrictCouncil, #HealthDepartment, #DistrictCollector #Entertainment,#Movies,#GramPanchayat, #PanchayatSamiti, #newstoday, #Jharkhand,#Assam, #Punjab, #police , #Indianarmy, #cm, #MP, #MLA, #ChiefMinister, #PrimeMinister,#President, #Agriculture, #Farmers, #Corruption, #Injustice, #Atrocities, #खासदार, #आमदार, #मुख्यमंत्री, #पंतप्रधान, #राष्ट्रपती, #किसान, #शेतकरी, #मित्र,#शिवसेना, #मनसे, #बसपा, #वंचित,#भाजपा, #कांग्रेस, #bjp, #congress, #shivsena, #mns, #bsp, #RPI, #rti, #RighttoInformation, #humanrights, #ncp, #commission for women, #crime,#सीबीआय, #cid, #ed, #RTO, #राष्ट्रवादी, #environment, grampanchayatnews