बाभुळगाव येथे कामगार समस्यांवर विदर्भस्तरीय विचारमंथन संमेलन संपन्न


         जिल्हा प्रतिनिधी- श्रीकांत राऊत यवतमाळ                                                    

  यवतमाळ :- कामगार समस्यांवर विदर्भस्तरीय विचारमंथन संमेलन २ में रोजी साई मंगल कार्यालय बाबुळगाव. जि. यवतमाळ येथे संपन्न झाले.जनवादी कामगार मजदूर संघटनेच्या वतीने यवतमाळ येथे विदर्भस्तरीय कामगार समस्या विचार मंथन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी या संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यावेळी संमेलनात कामगार चळवळीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, सध्याच्या काळातील बदलत्या कामगार समस्या, व आधुनिक औद्योगिक व्यवस्थेतील शोषणाच्या नव्या पद्धती या विषयावर विचार मांडले. याला कामगारांनी दाद दिली.


यावेळी जनवादी कामगार मजदूर संघटनेचे संस्थापक रत्नपाल डोफे, श्रमिक इमारत व इतर कामगार संघटना अमरावती. जिल्हाध्यक्ष भूषण उईके, अमरावती तालुकाध्यक्ष संकेत जिभकाटे,धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष रेणुका सपाटे, दर्यापूर तालुका अध्यक्ष सुनीता फुकट, दिवसा तालुकाध्यक्ष अंजली तसरे, बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सागर तायडे, महाराष्ट्र जनरल कामगार संघटना अध्यक्ष राजकुमार होळीकर, मजूर संघ अकोला अध्यक्ष प्रशांत मेश्राम, वर्धाचे मनीष गोरखेडे, नितीन वाकोडे, महेश दुबे आदी उपस्थित होते.

या संमेलनात विविध जिल्ह्यांतील कामगार कष्टकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगारांच्या समस्या

 1. 90दिवसाच्या प्रमाणपत्र ग्रामसेवक सही शिक्का देत नाही.

2. बांधकामगाराच्या मृत्यू झाला तर त्या मयत व्यक्तीचं रिन्यूअल झालं नसेल तर त्याच्या पत्नीला त्याच्या वारसाला कोणतेही प्रकारच्या लाभ दिला जात नाही.

3. कामगार मंत्री यांनी साठ वर्षे पूर्ण झाल्यावर पेन्शन योजना लागू केली त्यामध्ये साठ वर्षे पूर्ण व्हायच्या आधी वीस वर्षापासून नोंदणी असावी. 

4. कष्टकरी कामगार योजनेपासून वंचित बोगस कामगार योजनेचा लाभ दलालाच्या पाठपुराव्याने उचलतात. 

5. पूर्वीचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिवाळी बोनस  देण्याचे ठरविले होते परंतु ते अजूनही मिळाले नाही.

कामगार हक्क, वेतन असुरक्षा, सामाजिक सुरक्षेचे प्रश्न आणि संघटनांच्या भविष्यातील भूमिका यावर सुसंवादी चर्चा झाली. हे संमेलन म्हणजे कामगारांच्या प्रश्नांची दिशा शोधण्याचा एक सामूहिक प्रयत्न होता. राज्यातील कष्टकरी कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी अशा संवादांची आणि कृतींची गरज अधिक भासते आहे. जनवादी बांधकाम कामगार मजदुर संघटना यवतमाळ यांच्या वतीने श्रमिक इमारत व इतर कामगार संघटना अमरावती. जिल्हाध्यक्ष भूषण उईके, अमरावती तालुकाध्यक्ष संकेत जिभकाटे,धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष रेणुका सपाटे, दर्यापूर तालुका अध्यक्ष सुनीता फुकट, तिवसा तालुकाध्यक्ष अंजली तसरे, जिल्हाध्यक्ष आणि सर्व तालुका अध्यक्ष यांचे सत्कार करण्यात आला.

   शाल पुष्पगुच्छ  सन्मान चिन्ह श्रीफळ सत्कार समारंभ पार पडला. जनरल कामगार संघटना शिराळा. अमरावती तालुका अध्यक्ष संकेत जानरावजी जिभकाटे सर्व प्रकारच्या कामगारांच्या समस्या आणि उपयोजना प्रत्येक कामगारापर्यंत सर्व योजना लाभ सातत्याने प्रयत्न करून लाभ मिळून देण्याची कामगिरी केल्याबद्दल जनवादी बांधकाम मजदुर संघटना यवतमाळ जिल्हा अध्यक्ष रत्नपाल डोळे यांनी शाल श्रीफळ फुलगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post