विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर गोसावी
अकोला , बाळापूर : बाळापूर पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मोरे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील गावगाड्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरपंचांचा सत्कार करण्याचे नियोजन गटविकास अधिकारी मोरे यांनी केले. त्यामध्ये गायगाव, रिधोरा, वाडेगाव, देगांव, धनेगाव व अंदुरा या ग्रामपंचायतच्या सरपंचांचा सत्कार पंचायत समितीमध्ये करण्यात आला.
या कार्यकमाला गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत अंदुरा सरपंच संजय वानखडे यांनी हा सत्कार माझा नसून आपल्या गावचा आहे. प्रथमच आपल्या अंदुरा गावाला बहुमान मिळाला त्यामुळे सर्व पदाधिकारी कर्मचारी व गावकऱ्यांचे अभिनंदन व धन्यवाद मानले.