तुंबलेल्या नाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात ; सर्वत्र पसरली दुर्गंधी


 

तुंबलेल्या नाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात  ; सर्वत्र पसरली दुर्गंधी

 तुंबलेल्या नाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सर्वत्र पसरली दुर्गंधी



अमरावती :- स्थानिक झोन क्रमांक 03 दस्तुर नगर येथील बेनोडा परिसरातील मुंगसाजी मंगल कार्यालयाजवळ असलेला नाला कित्येक महिन्यापासून साफ केला नसल्याने त्यात मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचला असून नाला पूर्णपणे तुंबलेला आहे,व या नाल्याचा पाणी प्रवाह सुरळीत होत नसल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असून या नाल्याच्या घाण पाण्यात जनावरे व मछरांचे प्रमाण वाढले असल्याने रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे हा नाला स्वछ करून बंद असलेला पाणी प्रवाह सुरळीत करणेबाबतची तक्रार दिनांक 27/04/2025 रोजी मनपा कडे ऑनलाईन,व्हाट्सएप,तसेच प्रत्यक्षात श्री गोविंदा रेसिडेन्सी मालू लेआऊट कलोती नगर येथील नागरिकांनी केलेली आहे.



परंतु आठ दिवस उलटूनही अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही संबंधित विभागाने केलेली नाही परिणामी परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे सदर तुंबलेला नाला त्वरित स्वच्छ करून पाणी प्रवाह सुरळीत करण्याची मागणी परिसरातील गजानन ठवकर,सतीश माहुरे,नितीन देशमुख, संदीप तायडे,महेश खत्री, आकाश बेदरकर,हरीश पारवाणी,विलास चौधरी,दिनेश सोनी,कपिल बजाज,रचना झा,अनिल डांगे,निलेश सचदेव,विलीसेठ सावलानी,मनीष वरदाणी, अरुण सोनवणे,धीरज आसरा,अतुल फुटाणे,संजय मनवर, जे डी डोंगरदिवे,प्रकाश शेळके,सुरज मेश्राम ई. नागरिकांनी केली आहे

Post a Comment

Previous Post Next Post