Murtizapurnews| पेट्रोल पंपावरील मजुराला लोखंडी पाईपने मारहाण

 


           विदर्भ संपादक मिलींद जामनिक 

मूर्तिजापूर : शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिरपूर मार्गांवरील मातोश्री पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला पेट्रोल भरण्याच्या वादावरून दोन अज्ञात इसमानी लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केल्याची घटना 18 एप्रिल रोजी रात्री 11वाजताच्या दरम्यान घडली आहे.

       मातोश्री पेट्रोल पंपवार काम करणारा सेल्समन स्वप्नील मनोहर बावनकर वय 25 याला पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकी क्र एम एच 30 बी वाय 1139 चा चालक व मागे 

बसलेल्या इसमाने क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करून लाथा बुक्क्यानी मारहाण करीत लोखंडी पाईपने डोळ्याच्या भुवई ला मार लागल्याने जखमी झाला. सदरच्या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला फिर्याददिल्यावरून अज्ञात दोन आरोपी विरुद्ध 115(2),118(1),352,3(5) कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिष शिंदे हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post