गावाकडची बातमी| ग्रामपंचायत आमखेडा येथील मग्रारोहयो सिंचन विहिरी कामात भ्रष्टाचार

 



 


"चौकशी व दोषींवर कारवाईची कैलास बनसोड यांची मागणी"


Gavakadachi Batmi News Network 

वाशिम, मालेगाव : ग्रामपंचायत आमखेडा (ता. मालेगाव, जि. वाशिम) येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत (मग्रारोहयो) मंजूर झालेल्या सिंचन विहिरीच्या कामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कैलास आत्माराम बनसोड यांनी जिल्हा परिषद वाशिमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या प्रकरणात तक्रारदार बनसोड यांनी ३० डिसेंबर २०२४ रोजी निवेदन दिले होते. त्यानंतर पंचायत समिती मालेगाव व ग्रामपंचायत आमखेडा यांच्याकडून अहवाल सादर करण्यात आला. तथापि, सदर अहवालात कोणतीही प्रत्यक्ष पाहणी न करता अहवाल देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.


तक्रारदाराच्या म्हणण्या नुसार, सरपंच व सचिव यांना अशा प्रकारची चौकशी करण्याचा अधिकार विहिरीच्या नाही. शिवाय, खोद कामासाठी आवश्यक असलेले बांधकाम साहित्य ग्राम पंचायतीकडे उपलब्ध नव्हते. अशा स्थितीत मजुरांकडून काम कसे झाले, हा प्रश्न उपस्थित होतो. मग्रारोहयो अंतर्गत कोणतेही काम कंत्राटी पद्धतीने करता येत नाही, असे स्पष्ट निर्देश असतानाही, सदर विहिरीचे काम यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने करण्यात आल्याचा आरोप बनसोड यांनी केला आहे.

तसेच विहिरीसाठी वापरण्यात येणारी उपकरणे, जसे की पंप यंत्र, ट्रॅक्टरवर बसवलेला संपिडक हातोडा, मोटराईज पुली इ. यांची खातरजमा न करता काम झाले आहे. सदर प्रकरणात गटविकास अधिकारी, नरेगा वाशिम यांनी गटविकास अधिकारी मालेगाव यांना २१ मार्च २०२५ रोजी आदेश दिला होता की, सदर तक्रारीवर प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी अहवाल सादर करावा. मात्र, आजतागायत अशी कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या अनियमित चौकशीमुळे संबंधित अधिकारी वर्ग १ यांच्या भूमिका संशयास्पद असून, त्यांच्याविरुद्ध योग्य ती शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर प्रकारामुळे ग्रामविकास व लोकांचा शासनावरील विश्वास डळमळीत होण्याची शक्यता असल्याचे मत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण नरेगा योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मजुरांना रोजगार मिळावा म्हणून केंद्र सरकार ही योजना चालवत आहे, मात्र या योजनेचा गैरवापर करून काही अधिकारी व पदाधिकारी स्वतःचे खिसे भरत आहेत. असल्याचे बोलल्या जात आहे.


                    • प्रशासनाकडून दुर्लक्ष •

नरेगा गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम यांनी गटविकास अधिकारी मालेगाव यांना याप्रकरणी मोका पाहणी व सखोल चौकशीचे आदेश २१ मार्च २०२५ रोजीच दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर आमखेडा ग्रामपंचायतीतील कामकाजावर आणि योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्न निर्माण झाले असून, दोषींवर त्वरित व कठोर कारवाई होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


Tags -: #ग्रामपंचायत #आमखेडा #भ्रष्टाचारबातमी #वाशीम #मालेगाव #पंचायतसमिती #ग्रामपंचायतबातमी #जिल्हा_परिषद_वाशीम #जिल्हापरिषद #zp #panchyatDepartment #Washim #पंचायतराज #ग्रामविकासमंत्री #गटविकासअधिकारी, #GavakadachiBatmi #Maharashtra #गावाकडचीबातमी, #Editor-in-Chief Devendra Bhonde, #Panchayat_samiti_Malegaon, #विभागीय_आयुक्त_अमरावती #जिल्हाधिकारीवाशीम, #जिल्हाधिकारी_कार्यालय_वाशीम #बच्चूकडू #नरेंद्रमोदी #भाजपा, #कांग्रेस #मनसे, बसपा, #देवेंद्रफडणवीस, #जितेंद्रआव्हाड, #शरदपवार, #अजितपवार, #राजठाकरे, #पालकमंत्री #आम्ही_गावकरी, #गावसहेली, #देवेंद्रभोंडे, #कैलासबनसोड, #kailashbansod, #राज्य_माहिती_आयोग, #माहिती_अधिकार, #RTI, #India, #भारत, #Right to Information #मानवीहक्क, #मानवाधिकार

Post a Comment

Previous Post Next Post