शेलूबाजार मंडळात दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते ११ यावेळेत आयोजन
गावाकडची बातमी विदर्भ संपादक मिलींद जामनिक
मूर्तिजापूर - महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर तालुक्यातल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे संबंधित विभागांशी दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व नागरिकांच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे. तसेच महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते ११ पर्यत शेलूबाजार या मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी अकोला यांनी गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्हयास मिळणा-या नियतव्ययाच्या प्रमाणात कोणताही बदल न करता महसुली क्षेत्रिय कार्यालयाकडून जनतेस सोई सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान मूर्तिजापूर तालुक्यातील मंडळ स्तरावर आयोजीत करण्यात येणार आहे.
यामध्ये ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी विद्यार्थी, व महिला यांना रहिवाशी उत्पन्न् व जातीचे दाखले, रेशन कार्ड वाटप, सामाजिक लाभाच्या योजना जसे, संजय गांधी निराधार योजना, पी.एम, किसान योजना ॲग्रीस्टॅक, जलातारा इ. महसुल विभागाशी संबंधीत विविध प्रमाणपत्रांचे वाटप, प्रमाणपत्राबाबत नागरिकांच्या तक्रारी स्तवर निकालात काढण्यात येऊन मंडळ स्तरावर "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजीत करून त्यामध्ये विविध महसुली दाखले, जनतेच्या तक्रारीचे निवारण तथा मार्गदर्शन करून महसुली प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील राहण्यासाठी सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबीरामध्ये संबंधीत मंडळ अधिकारी व संबंधीत ग्राम महसुल अधिकारी, संबंधीत नायब तहसीलदार, महसुल यंत्रनेव्दारे शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरीता आराखडा व नियोजन करण्यात आले आहे. तरी मुर्तीजापूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी "छञपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून तहसीदार शिल्पा बोबडे यांनी केले आहे.
